लठ्ठपणा हा काही अचानक उद्भवणारा संसर्गजन्य आजार नाही, तर तो आपल्या लाइफस्टाईलशी संबंधित आजार आहे. जर तुमची लाइफस्टाईल योग्य असेल तर लठ्ठपणाची समस्या तुम्हाला त्रास देणार नाही आणि जर तुमची लाइफस्टाईल कंटाळवाणी किंवा धकाधकीची असेल, नियमित नसेल तर लवकरच तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मुलांमध्ये तसेच तरुणांमध्ये वाढत चाललेला लठ्ठपणा ही पालकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरत चालली आहे कारण सध्या लहान मुले देखील जास्त वजनाची आहेत. जर मुलांना लहानपणापासूनच संतुलित आणि योग्य आहार दिला गेला आणि निरोगी लाइफस्टाईलबद्दल समजावून सांगितले गेले तर त्यांचे वजन नियंत्रित राहील आणि ते निरोगीही राहतील. मुलांचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काय करता येऊ शकेल हे आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
‘मुलांना भरपूर भाज्या, फळे आणि धान्ये खायला द्यावीत.’ तसेच, त्यांना पुरेसे पाणी देखील प्यायला दिले पाहिजे. नेहमी कुटुंबासोबत बसून जेवण्याकरता त्यांच्याकडे आग्रह धरावा आणि मुले जेवत असताना स्क्रीन चालू नसावी जेणेकरून मुलांचे पूर्ण लक्ष केवळ खाण्याकडेच राहील. मुलाला अन्नाचा आकार, चव आणि पोत व पोट भरल्यावर शरीर कोणते संकेत देते हे समजून घेऊ द्या.
सध्या बरेच पालक आपल्या मुलांना पॅक्ड केलेले अन्न खायला देतात, जे अत्यंत चुकीचे आहे. त्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह असतात ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात. जेव्हा मुले जंक फूड मागतात तेव्हा पालकांनी नकार द्यायला शिकले पाहिजे. टीव्हीवर आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये इतक्या आकर्षक जाहिराती बनवलेल्या असतात की त्यांना बळी पडून पालक आपल्या मुलांसाठी असे पदार्थ सहजरित्या खरेदी करतात. पण या फसव्या जाहिरातींपासून वाचले पाहिजे आणि मुलांना जंक फूडपासून दूर ठेवले पाहिजे.
अनेकदा असे दिसून येते की मूल एखाद्या गोष्टीचा आग्रह धरताच पालक त्याला मोबाईल फोन देतात किंवा टीव्ही चालू करतात. तुम्हाला या गोष्टी टाळाव्या लागतील. त्याऐवजी, मुलाला शारीरिक हालचाली करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. यामध्ये धावणे, उडी मारणे, सायकलिंग, पोहणे इत्यादी खेळांचा समावेश असू शकतो.
स्क्रीन टाइम कमी करणे आणि शारीरिक हालचाली वाढवणे यामुळे मुलाच्या शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेव्हा मूल मोठे होऊ लागते तेव्हा त्याला मैदानात किंवा घरी खेळायला सांगा. याचा त्याच्या मनावर आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करणे, वेळेवर झोपणे, वेळेवर जेवणे, आंघोळ करणे इत्यादी कोणत्याही सवयी लावल्या तर भविष्यात त्या खूप फायदेशीर ठरू शकतील. जर तुमचे मूल या गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता.
हेही वाचा : Heatstroke : उष्माघात – लक्षणे, कारणे आणि प्राथमिक उपचार
संपादित – तनवी गुडे