Arjun Tendulkar: उद्याचा दिग्गज! झहीर खानसोबतच्या 'त्या' व्हिडिओवर अर्जुनला मिळाला नवा टॅग; आधी योगराज यांनी म्हटलेलं पुढचा गेल
esakal April 27, 2025 09:45 AM

भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा देखील क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवत आहे. २५ वर्षीय अर्जुन सध्या आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्ससोबत आहे. काही दिवसांपूर्वीच युवराज सिंगचे वडील योगराज यांनी केलेल्या विधानानंतर तो चर्चेत आला होता.

योगराज यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. योगाराज यांनी म्हटले होते की अर्जुनने युवराजकडून प्रशिक्षण घेतले, तर तो तीन महिन्यात ख्रिस गेलसारखा आक्रमक फलंदाज बनेल.

यानंतर आता त्याचा एक लखनौ सुपर जायंट्सने शेअर केला आहे, ज्यात त्यांनी त्याला उद्याचा दिग्गज असं म्हटलं आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.

यासाठी दोन्ही संघ सध्या मुंबईत असून सराव करत आहेत. यावेळी अर्जुन लखनौचा मेंटॉर झहीर खानसोबत सराव करताना दिसला होता. याचा व्हिडिओ लखनौने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

लखनौने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसले की बाऊंड्री लाईनबाहेर अर्जुन झहीरकडून मार्गदर्शन घेत आहे. तसेच मैदानात लखनौचा युवा खेळाडू आर्यन जुयाल मुंबईचा फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डकडून मार्गदर्शन घेत आहे.

त्यामुळे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लखनौने लिहिले आहे की 'आजचे मार्गदर्शन, उद्याचे दिग्गज'. या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत.

दरम्यान, अर्जुनला अद्याप आयपीएल २०२५ स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. अर्जुनने आयपीएल २०२३ मधून मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले होते. त्याने ५ आयपीएल सामने आत्तापर्यंत खेळले असून ३ विकेट्स घेतल्या आहेत. आणि एकाच डावात फलंदाजी करताना १३ धावा केल्या आहेत.

२३ वर्षीय आर्यनबद्दल सांगायचे झाले, तर तो उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो गेल्यावर्षी मुंबई इंडियन्स संघात होता. त्याला यावर्षी लखनौने संघात घेतलं. मात्र अद्याप त्याला आयपीएल पदाप्पणाची संधी मिळालेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.