Esha Deol VS Amrita Rao: बॉलिवूडमध्ये कलाकारांमधील मतभेद आणि वाद काही नवीन नाहीत, पण २००५ मध्ये 'प्यारे मोहन' चित्रपटाच्या सेटवर घडलेली घटना विशेष लक्षवेधी ठरली. त्यावेळी अभिनेत्री ईशा देओल आणि अमृता राव यांच्यातील वाद इतका वाढला की, ईशाने अमृताला कानाखाली मारली. या घटनेबद्दल ईशा देओलने नंतर दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, तिला या कृतीबद्दल कोणताही पश्चाताप नाही.
ईशा देओलने एका मुलाखतीत सांगितले की, शूटिंगनंतरच्या एका दिवशी अमृता रावने दिग्दर्शक इंद्र कुमार आणि कॅमेरामनच्या समोर तिला अपशब्द वापरले. ईशाने म्हटले, "माझ्या आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी, त्या क्षणी मी तिला कानाखाली मारली. मला याबद्दल कोणताही पश्चाताप नाही."
या घटनेनंतर, अमृता रावने आपली चूक लक्षात घेऊन ईशाची माफी मागितली आणि ईशाने तिला माफ केले. ईशाने सांगितले, "आता आमच्यात सर्व काही ठीक आहे." ईशा देओलने स्पष्ट केले की, ती एका सुसंस्कृत कुटुंबातून आली आहे आणि अशा प्रकारची कृती तिच्या स्वभावात नाही, परंतु जर कोणी तिच्या आत्मसन्मानावर आघात करत असेल, तर ती स्वतःसाठी स्टॅन्ड घेऊ शकते.
आणि यांच्यातील हा वाद आता इतिहासजमा झाला असला तरी, तो आजही चर्चेचा विषय ठरतो. असे अनेक प्रकार आहेत. त्यावरून बॉलीवूडमधील भांडणाचे आणि वादाचे उदाहरण समोर आले आहेत.