Thalapathy Vijay: तमिळ अभिनेता आणि राजकारणी थलापथी विजय यांच्या कोयंबतूरमधील प्रचार रॅलीत एक चाहत्याने धाडसी कृती केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, विजय त्याच्या गाडीवरून चाहत्यांना ग्रीट करत असताना, एक चाहता झाडावरून थेट त्यांच्या वाहनावर उडी मारताना दिसतो. या अनपेक्षित घटनेमुळे विजय काही क्षणांसाठी घाबरला होता.
या घटनेनंतर, विजयने त्या चाहत्याला उभे राहण्यास मदत केली आणि आपल्या पक्षाच्या 'तमिळगा वेत्त्री कळगम' (TVK) चा स्कार्फ त्याच्या गळ्यात घातला. त्यानंतर आणखी एक चाहता वाहनावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसला, त्याने विजयने गाडीच्या आत प्रवेश केला विजयच्या गळ्यात 'तमिळगा वेत्त्री कळगम' (TVK) चा स्कार्फ घातला.
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांनी या कृतीवर टीका केली आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले की हा प्रकार आधीच प्लॅन केला होता. तर एका चाहत्याने लिहिले की, हा त्या मुलाचा वेडेपणा आहे. गाडीवर उडी मारताना त्याला काहीही होऊ शकला असता. तर, काही नेटकाऱ्यानी विजयने त्या मुलाला ज्याप्रकारे सांभाळले त्या कृतीचे कौतुक करत आहेत.
सध्या आपल्या आगामी चित्रपट '' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत, ज्यात पूजा हेगडे, बॉबी देओल आणि ममिता बैजू यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 2026 च्या पोंगलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर विजय पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.