- बिल्डर विजयकमल प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड (रवि ग्रुप) च्या कार्यालयाची झोपडपट्टीधारकांनी तोडफोड केली.
- कांदिवली पश्चिम येथील एकता नगर परिसरात रवी ग्रुपच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे.
- मात्र, अनेक झोपडीधारकांना भाडे न मिळाल्यामुळे आक्रमक झालेल्या झोपडपट्टीधारकांनी विकासकाच्या कार्यालयावर हल्ला केला.
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री महायुतीतील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांचा तोडगा काढणार - रवींद्र चव्हाणअकोला येथे भाजपच्या पश्चिम विदर्भ संघटनात्मक बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेसंदर्भात योग्य पाऊले उचलली आहेत. तसेच, त्यांनी पुढे म्हटले की, येत्या 30 एप्रिलपर्यंत राज्यातील भाजप जिल्हाध्यक्षांची नेमणूक पूर्ण होईल.
Live: वाळू माफियाची नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलाला धक्काबुक्कीवाळूचा उपसा करून त्याची विना परवाना विक्री करणाऱ्या वाळू माफियानं नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलासोबत हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या खमारी गावात घडला. मोहाडी तालुक्यातील खमारी येथील नदीपात्रातून वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावर मोहाडीचे नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार हे खमारी गावात पोहचलेत.
Live : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नागपुरात निषेधपहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ नागपुरातील लाफटर क्लबच्या सर्व धर्मीय नागरिकांनी हातात होर्डिंग घेऊन निषेध नोंदवला...
Live: 'पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध पुकारा', आठवलेंची प्रतिक्रिया'जो पर्यंत पाक व्याप्त काश्मीर आहे तो पर्यंत आतंकवादी कारवाया सुरूच राहणार .. याकरिता माझी भारत सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या आणि देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात पहेलगाम हल्ल्यवर प्रतिक्रिया देताना सांगितले..
Live : नांदगावला आठ गावांत अकरा टँकरसाठी प्रस्तावनाशिकमधील नांदगाव तालुक्यात आठ गावे व त्यालगतच्या वाड्यावस्त्यासाठी टँकर सुरू झाले असून नव्याने पुन्हा अकरा गावे व वाड्या वस्त्यांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर सुरु करण्यासाठी नाशिकच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात नांदगाव ताल्लुक्यात सर्वाधिक म्हणजे ७७ टँकर सुरु होते.
Satara Live : लिफ्ट मागून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू ; पिकअप गाडीने दिली धडकसाताऱ्यातील सज्जनगड घाट रस्त्यावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेऊन घरी परतताना दुचाकीला पिकप गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.यात दोन जिवलग मित्र असलेल्या दोन्ही लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला.वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत अशी या दोघांची नावे आहेत.हे दोघेही सज्जनगडापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या आंबोडे बुद्रूक गावातील आहेत.
Kolhapur Live : ग्रामपंचायत लिपिकावर विनयभंगाचा गुन्हा; गडमुडशिंगीत परस्परविरोधी फिर्यादी दाखलगडमुडशिंगी (ता. करवीर) ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य महिला पदाधिकारी व त्यांच्या पतीविरोधात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीची तक्रार ग्रामपंचायतीचे लिपिक अविनाश पांडुरंग कांबळे (वय ५०) यांनी दिली आहे. त्यानुसार या दोघांवर गांधीनगर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत मुख्य महिला पदाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अविनाश कांबळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Live : केजमध्ये भीषण अपघात; पिकअप व स्विफ्ट कारची समोरासमोर धडक, आठ जण जखमी; दोन महिलांसह दोन मुलंमुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) भोस्ते घाटात अपघाताचे (Bhoste Ghat Accident) सत्र कायम असून, रविवारी ट्रक, मोटार व अन्य एक ट्रक व दुचाकी अशा चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात ट्रकमधील दोघे व मोटारीतील सहा जण गंभीर जखमी झाले. अपघात रविवारी (ता. २३) दुपारी बाराच्या सुमारास झाला. संस्कृती संतोष कदम (वय ४२), जागृती वैभव शिंदे (३५), शोभा सदानंद कदम (६०), संतोष एकनाथ कदम (५१), मयुरी सदानंद कदम (३०) व जयराम वैभव सुर्वे (१४, सर्व रा. मुंबई) अशी मोटारीतील जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.
Mumbai Live : "महाराष्ट्राची जनता तुमची वाट पाहतेय" उद्धव-राज ठाकरे एकत्र यावेत म्हणून कार्यकर्त्यांची मातोश्रीबाहेर पुन्हा बॅनरबाजीउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र यावेत म्हणून मातोश्रीबाहेर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘मायेची सावली एक हात कर्तव्याच्या. मराठी माणसाच्या हितासाठी सुरक्षेसाठी व गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी उद्धव साहेब व राज साहेब आपण दोघं एकत्र या.महाराष्ट्रातील जनता आपली वाट बघतेय’. असा संदेश लिहिलेला बॅनर मातोश्रीबाहेर लावण्यात आला आहे.
Live : "आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचं कारण नाही" - एकनाथ शिंदे"गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी देश तात्काळ सोडावा. महाराष्ट्रातसुद्धा ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असं फर्मान सरकारने काढलं आहे. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा इशारा दिलेला आहे. आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचं कारण नाही. जे आश्रय देतील त्यांच्यावरही कारवाई होईल.” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Kolhapur Live : "कोल्हापूर-नागपूर विमानसेवा १५ पासून" - खासदार धनंजय महाडिकराज्याची उपराजधानी नागपूरशी आता कोल्हापूर हवाई सेवेद्वारे जोडले जाणार आहे. येत्या १५ मेपासून नागपूर-कोल्हापूर सेवेला प्रारंभ होणार असून, यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही सेवा सुरू राहणार असून, स्टार एअरवेजच्या विमानात १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकॉनॉमी क्लास आसन व्यवस्था असेल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकाद्वारे दिली आहे.
Nashik Live : नाशिकमध्ये सीएनजीचा तुटवडा ! वाहनचालकांना होतोय मनस्तापकाही दिवसांपासून शहरातील पंपांवर निर्माण झालेला सीएनजीचा तुटवडा अद्यापही कायम आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाकडून आश्वासन देऊनही अद्याप मुबलक पुरवठा होत नसल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी (ता. २६) मुंबई- आग्रा महामार्गावरील कंपनीच्या पंपाबाहेर वाहनांची लांब रांग लागल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले.
श्रीनगरच्या दाल सरोवरावर शहराचे निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांचे आगमन सुरूचश्रीनगरच्या दाल सरोवरावर शहराचे निसर्गरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांचे आगमन सुरूच आहे.
Live Update: तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकीतिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. विमानतळाला ईमेलद्वारे धमकी मिळाली. बॉम्ब निकामी करणारे पथक टर्मिनल्सची तपासणी करत आहे: पीआरओ, तिरुवनंतपुरम विमानतळ अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Live Update: शोभा करंदलाजे यांनी ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे नेतृत्व केलेकेंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री, श्रीमती शोभा करंदलाजे यांनी ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे नेतृत्व केले
Pm Modi Man Ki Baat : एका वर्षात देशभरात १.४ अब्जांपेक्षा अधिक झाडे लावण्यात आली - पंतप्रधान मोदीएका वर्षात देशभरात १.४ अब्जांपेक्षा अधिक झाडे लावण्यात आली - पंतप्रधान मोदी
या हल्ल्यांतर संपूर्ण देशात आक्रोष आहे. तोच आक्रोष जगभरता आहे. जगभरातील नेत्यांनी संवाद साधला. या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला आहे. संपूर्ण जग दहशतवाद विरोधातील लढाईत भारताबरोबर आहे. पीडितकुटुंबियांना न्याय मिळेलच, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Hingoli Live : हिंगोली पारा 44 सेल्सिअसवर , पपईच्या बागा करपल्याराज्यात सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा पारा दररोज वाढत आहे, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 44 सेल्सिअंस तापमानाची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत या सगळ्यांचा फटका बागायती पिकांना बसलाय त्यासोबतच फळबागा देखील वाढत्या तापमानामुळे करपून जात आहेत.
Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला पॅनिक ॲटॅक, उपचार सुरुसंतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला पॅनिक ॲटॅक
दुपारच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी.
डॉक्टरांनी रक्त चाचण्या करण्याचा दिला सल्ला.
रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर होणार पुढील उपचार
वाल्मीक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागरात
J & K Live : पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएने ताब्यात घेतलापहलगाम दहशतवादी हल्ल्याचा खटला एनआयएने जम्मू-काश्मीर पोलिसांकडून ताब्यात घेतला, तपास सुरू केला
Haridwar Live : हरिद्वारमध्ये वैशाख अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दीउत्तराखंडमधील हरिद्वार या तिर्थस्थळी वैशाख अमावस्येनिमित्त हरी की पौरी येथे भाविकांनी गर्दी केली आहे.
Buldhana Live : पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्तमहाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतापलं होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
J&K Live : पाकिस्तानी सैन्याचा एलओसीवर गोळीबार, भारताकडून चोख उत्तरपाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला असून भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.