प्रवासी संख्या वाढल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता हा होल्डिंग् झोन तयार करण्यात येणार
पुणे रेल्वे स्थानकावरील पलट क्रमांक एकच्या शेजारी व्हीआयपी गेट शेजारी हा झोन उभारण्यात येणार
या ठिकाणी प्रवाशांसाठी पाणी आणि बसण्याची सोय करण्यात येणार
उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे स्थानकावर बाहेर जाणारे प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाचा निर्णय
Pune News : उन्हाळ्याच्या सुट्ट्या अन् बंद घरांवर चोरांचा डोळाफिरायला जात असाल तर दक्षता बाळगा, एप्रिल आणि मे महिन्यात चोरटे सक्रिय
गेल्या वर्षी आठ महिन्यात शहरात 335 चोऱ्या झाल्याची नोंद
मे महिन्यात बहुतांश अनेकांना सुट्टी असतात त्यामुळे नागरिक याचा फायदा घेत फिरायला जातात
हीच संधी साधून चोरटे देखील सक्रिय झाल्याचे दरवर्षी या महिन्यातील घरफोड्यांच्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे
पुणे शहरात घरपोळ्यांचे प्रमाण कमी असले तरी गेल्या वर्षी आठ महिन्यांमध्ये शहरात 335 चोऱ्या झाल्याची नोंद
फिरायला जाताना नागरिकांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असं अन्य किमती वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनरचा अपघातमुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा खंडाळा दरम्यान असलेल्या राज हॉटेल समोर रात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचा वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटच्या खांबाला जोरदार धडक 'देत समोर जाणारी कार व दुचाकी यांना देखील धडक देऊन कंटेनर पलटी झाला. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहे.. मागील आठवड्यात देखील खंडाळा बॅटरी या ठिकाणी एका अवजड वाहनाने समोर जाणाऱ्या कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद असताना देखील मोठचा प्रमाणात अवजड वाहने शहरातून जात असल्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.
उल्हासनगरात ओव्हरलोड ट्रकला भीषण आगउल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनी अयप्पा मंदिर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रान्सपोर्ट ट्रकने पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री घडली. या आगीत ट्रकमधील माल जळून खाक झाला, तर इमारतीच्या बाल्कनीमध्ये आगीच्या झळा पोहोचल्यानं मोठं नुकसान झालं.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला होणार सुरुवात- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या 18 जागेच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून होणार सुरुवात..
- भाजप आमदार सुभाष देशमुख आणि भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष..
- सोलापूर बाजार समितीच्या 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात, काल 96.24% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क..
- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..
- आमदार देशमुख यांचं श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल आणि आमदार कल्याणशेट्टी यांचं श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल मधून कोण मारणार बाजी याकडे राज्याचे लक्ष..
- आमदार सुभाष देशमुख यांना भाजप आमदार विजयकुमार देशमुख काँग्रेस माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा पाठिंबा तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना भाजप आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या यांच्या पॅनलची लागणार कसोटी...
पाण्याअभावी प्रकल्पातील माशांचा तडफडून मृत्यूवाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच अनेक लहान मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला आहे, पाणीटंचाईच्या समस्या वाढली आहे. तर त्यामुळं अनेक जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना प्रकल्पातील मासे सुद्धा पाण्याअभावी तडफडून मृत्यूमुखी पडत असल्याचा प्रकार मालेगाव तालुक्यातील मोठा प्रकल्प असलेल्या कोल्ही प्रकल्पात समोर आलाय, याच प्रकल्पाच्या काठावर मोठ्या प्रमाणात माशांचा खच पडलाय.
पाणीटंचाईवर आढावा बैठकीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देशरायगड जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल, त्या ठिकाणी आवश्यक तपासणी करून 24 तासांच्या आत टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, टंचाईग्रस्त गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाणीटंचाईवर आढावा बैठकीत दिले आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या 106 वाड्या आणि 21 गावांना 25 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच 17 विहिरी खोल करणे व गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
दिवा सावंत वाडी गाडीला पेण स्थानकात थांबा पूर्ववत करा; पेण प्रवासी संघाची खासदारांकडे मागणीदिवा सावंत वाडी पसेंजर गाडीला पेण रेल्वे स्थानकात थांबा पूर्ववत करावा अशी मागणी पेण प्रवासी संघाने केली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धैर्यशील पाटील यांची भेट घेतली आणि रेल्वे बोर्डाकडे केलेल्या पत्र व्यवहाराची चर्चा केली. 30 एप्रिल रोजी मध्य रेल्वे व मुंबई मंडळ यांची बैठक पेण येथे होणार असून या बैठकीत निर्णय घेऊन 1 मे पासून पेण स्थानकात गाडी थांबेल अशी व्यवस्था करावी असा आग्रह धरण्यात आला आहे.