Stock Market Closing Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये तीव्र चढ-उतार दिसून आले. आज सेन्सेक्स 81,000 च्या वर गेला होता. निफ्टी देखील 24,600च्या जवळ गेला. पण नंतर त्यात घसरण झाली. सेन्सेक्स 259 अंकांनी वाढून 80,501वर बंद झाला. निफ्टी 12 अंकांनी वाढून 24,346 वर आणि बँक निफ्टी 28 अंकांनी वाढून 55,115 वर बंद झाला.
कोणते शेअर्स तेजीत?सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्समध्ये अदानी पोर्ट्सने सर्वाधिक नफा कमावला. चांगल्या तिमाही निकालांमुळे अदानी समूहाचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक वधारले. बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकी यांचे शेअर सर्वाधिक वधारले.
दुसरीकडे, बेंचमार्क निर्देशांकात नेस्ले इंडिया, एनटीपीसी, भारती एअरटेल, अल्ट्राटेक आणि एचयूएल हे शेअर्स सर्वाधिक घसरले होते.
निफ्टी मिडकॅप 100 मध्ये 0.5 टक्क्यांनी घसरण झाली. तर निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकात 0.24 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय, निफ्टी आयटी, ऑटो आणि बँक निर्देशांक तेजीत होते. तर एनर्जी, एफएमसीजी, फार्मा आणि रिअल्टी हे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
आज 2 मे रोजी बीएसईवर लिस्टेड एकूण मार्केट कॅप 422.65 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या मागील व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच बुधवार, 30 एप्रिल रोजी 423.24 लाख कोटी रुपये होते.
अशाप्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 59,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 59,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.
आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये वाढीसह बंद झालेल्या संख्या जास्त होती. आज एक्सचेंजवर एकूण 4,085 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. यापैकी 1,761 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर 2,183 शेअर्समध्ये घसरण झाली.
तर 141 शेअर्स कोणत्याही चढ-उतारांशिवाय स्थिर राहिले. याशिवाय, आजच्या व्यवहारात 67 शेअर्सनी 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला. तर 58 शेअर्सनी 52 आठवड्यांची नवीन नीचांकी पातळी गाठली.