भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू संजय बांगरचा मुलगा आर्यन काही दिवसांपूर्वीच अनाया बनला आहे. त्याने जेंडर सर्जरी केली, या सर्जरीनंतर तो मुलगी बनला आहे. जेंडर सर्जरी केल्यानंतर आपल्याला क्रिकेट खेळता येईल असं अनायाला वाटत होतं. मात्र आता तिला मोठा धक्का बसला आहे. या संदर्भात अनायाने आपल्या इंस्टा अकाऊंटवर एक पोस्ट देखील केली आहे. या पोस्टमधून तीने आपला राग व्यक्त केला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्ड ईसीबीकडून आता ट्रान्स वुमनच्या क्रिकेट खेळण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आर्यन बांगर याने काही दिवसांपूर्वीच जेंडर सर्जरी केली आहे, त्यानंतर तो एक ट्रान्स वुमन बनला आहे. तो आर्यनचा अनाया झाला आहे. अनायाला आपला नवा लूक देखील खूप आवडतो, मात्र आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून ट्रान्स वुमनच्या क्रिकेटवर बंदी घातल्यामुळे अनायाला क्रिकेट खेळता येणार नाहीये, ईसीबीने ट्रान्स वुमनच्या क्रिकेटवर बंदी घातल्यानंतर अनयाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
अनायानं काय म्हटलं?
अनायानं आपल्या इन्स्टा हँडलवर पोस्ट करताना म्हटलं आहे की, आता ईसीबीने ट्रान्स वुमनला केवळ व्यावसायिकच नाही तर इतर ठिकाणी क्रिकेट खेळण्यावर देखील पूर्णपणे बंदी घातली आहे. हा एक नियम नाही तर हा एक संदेश आहे. तुमचे समर्पण, प्रतिभा, शिस्त किंवा बदल पुरेसे नाहीयेत. मी फक्त एक ट्रान्स वुमन नाही तर एक क्रिकेटपटू देखील आहे.मात्र आता मला या खेळात भेदभावाचा सामना करावा लागत आहे. काही संस्था अशा असतात ज्या तुम्हाला पूर्णपणे तोडून टाकणाऱ्या रेषा आखतात, पण हा काही आमच्या डावाचा शेवट नाही, असं अनयानं आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यूजर्सच्या प्रतिक्रिया
अनायाच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे, एका यूजर्सने कमेंट करताना म्हटलं आहे की, तू स्वत:हून तुझ्या करिअरचं वाटोळं केलं आहे. तर दुसऱ्या यूजर्सने म्हटलं आहे की, आता करत बस बेली डान्स, तर तिसऱ्या यूजर्सने म्हटलं आहे की, तुला आता वाईट का वाटत आहे, तूच एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तू म्हटलं होतं की मी माझ्या मर्जीनं हे आयुष्य निवडलं आहे.