Sakal Vidya : 'विज्ञान क्षेत्रातील संधी'वर जितेंद्र पवन आणि विवेक घनगस करणार मार्गदर्शन
esakal May 07, 2025 07:45 AM

पिंपरी - सकाळ विद्या व मोशन ॲकॅडमीच्या वतीने ‘विज्ञान क्षेत्रातील संधी’ यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. रविवारी (ता. ११) जितेंद्र पवन आणि विवेक घनगस मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणार आहे.

मोशी येथील भारत माता चौकातील जय गणेश बॅक्वेंट हॉल व लॉन्स येथे आयोजित केले आहे. आठवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना या चर्चासत्रामध्ये ‘नीट’ असो वा ‘जेईई’ ‘एनडीए’, ‘सीईटी, ‘सीयुईटी’ या स्पर्धा परीक्षांविषयीच्या सर्वच शंकांचे निरसन होणार आहे. एक्स्पर्ट आयआयटीयन फॅकल्टी यांच्याद्वारे बोर्ड परीक्षेनंतरच्या करिअर पर्यायांचे मार्गदर्शन करतील.

असे आहेत मार्गदर्शक

जितेंद्र पवन यांना गणित शिकवण्याचा १७ वर्षांचा अनुभव आहे. कोटा आणि पुण्यात आयआयटी जेईईच्या इच्छुकांना ते गणित शिकवतात. त्यांनी ‘आयआयटी’ मुंबईमधून बीटेक संपादन केली आहे. पुण्यातील आयआयटी जेईईच्या इच्छुकांना भौतिकशास्त्र शिकविण्याचा १२ वर्षांचा अनुभव असलेले विवेक घनगस आहेत. त्यांनी आयआयटी गुवाहाटीमधून बीटेक केले आहे.

विज्ञान क्षेत्रात अनेक संधी

विज्ञान क्षेत्रात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित यासारख्या मूलभूत विषयांमध्ये मजबूत पाया असलेले विद्यार्थी, विविध उद्योगांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये नोकऱ्या मिळवू शकतात. शास्त्रज्ञ नवीन सिद्धांत विकसित करतात.

भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यासारखे विषय अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये वापरले जातात. औषध निर्माण क्षेत्र, बायोटेक्नोलॉजीमध्ये, डीएनए आणि जीन्स यासारख्या जैविक घटकांची माहिती मिळवण्यासाठी आवश्यक आहे. पर्यावरण विज्ञान, डेटा सायन्स क्षेत्र अशा अनेक संधी आहेत. अनेक उद्योगांमध्ये आणि सरकारी संस्थांमध्ये नोकऱ्या मिळण्याची संधी आहे.

का चर्चासत्राचे आयोजन?

बऱ्याचदा गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे क्षेत्र निवडीमुळे अनेकांची करिअर चुकतात. वेळेतच योग्य गुरूचा सल्ला मिळणे गरजेचे असते. त्यासाठीच्या विविध क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते.

म्हणूनच विद्यार्थ्याला विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील, तरच क्षेत्र निवड सोपी होते. याकरिता सकाळ विद्या व मोशन ॲकॅडमीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाबाबत...

  • काय? : ‘विज्ञान क्षेत्रातील संधी’ यावर मार्गदर्शन

  • कधी? : रविवार,

  • ता. ११ मे २०२५

  • केव्हा? : सकाळी ९.३० वाजता

  • कोण : जितेंद्र पवन आणि विवेक घनगस

  • कुठे? : श्री गणेश बॅक्वेट हॉल व लॉन्स, भारत माता चौक, मोशी

  • प्रवेश : विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

  • संपर्क : ९७३०९५९६९९

  • सहभागासाठी संपर्क किंवा क्यूआर कोड स्कॅन करा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.