Aly Goni: 'हम मुसलमानों को घर...'; 'या' अभिनेत्याला मुंबईत घर घेताना आला वाईट अनुभव, म्हणाला...
Saam TV May 07, 2025 08:45 PM

Aly Goni: टीव्ही अभिनेता अली गोनीने 'ये हैं मोहब्बतें' आणि 'बिग बॉस 14' सारख्या कार्यक्रमांमध्ये आपली छाप सोडली आहे,त्याने मुंबईत घर शोधताना आलेल्या अडचणींबद्दल आपले अनुभव शेअर केले आहेत. त्याने सांगितले की, मुस्लिम असल्यामुळे त्याला अनेक वेळा घर मिळवण्यात अडथळे आले. मुंबईसारख्या नगरातही धार्मिक आधारावर भेदभाव होतो, हे त्यांच्या अनुभवातून स्पष्ट होते.

अली गोनीने एका मुलाखतीत सांगितले की, "मी मुंबईत आलो तेव्हा मला घर मिळवण्यात खूप अडचणी आल्या. लोक म्हणायचे, 'हम मुसलमानों को घर नहीं देते'." त्याने हेही नमूद केले की, "आपण सर्वजण समान्य नागरिक आहोत, आपल्याकडे समान्य ओळखपत्रे आहेत, तरीही अशा प्रकारचा भेदभाव का?" त्याने या अनुभवामुळे आपल्याला खूप दुःख झाल्याचेही व्यक्त केले.

मुंबईत मुस्लिम समुदायाला घर मिळवण्यात येणाऱ्या अडचणी केवळ अली गोनीपुरत्या मर्यादित नाहीत. अनेक मुस्लिम नागरिकांनी अशा प्रकारच्या भेदभावाचा सामना केला आहे. उदाहरणार्थ, २५ वर्षांची मिस्बाह कादरी हिला मुंबईतील एका अपार्टमेंटमधून केवळ मुस्लिम असल्यामुळे बाहेर काढण्यात आले. तिला देखील, "हमें मुसलमानों को घर नहीं देते असे सांगण्यात आले" या प्रकारच्या घटनांमुळे मुंबईतील विविधतेला धोका निर्माण होतो आहे.

ने हा कार्यक्रम केला होता. या शोमधील त्याच्या कामाचे आणि पाक कलेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. या शोमध्ये त्याने विविध प्रकारचे उत्तम पदार्थ बनवून जजेस आणि प्रेक्षकांचे मन जिंकले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.