मराठमोळा अभिनेता भरत जाधव याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
त्याने अनेक नाटकं आणि चित्रपटात भन्नाट भूमिका साकारत प्रेक्षकांना प्रेमात पाडलं.
मात्र करोनानंतर तो कोल्हापूरला शिफ्ट झाला. तिथे तो त्याच्या आई- वडील, पत्नी आणि मुलांसोबत राहतो.
भरतने अनेक मुलाखतींमध्ये आपल्याला कोल्हापूर आवडत असल्याचं वक्तव्य केलंय.
नुकत्याच आरपार युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भरत यांनी त्यांना कोल्हापूरमधलं सगळ्यात जास्त काय आवडतं ते सांगितलंय.
भरत म्हणाले, 'कोल्हापुरातली माणसं. खूप गुणी माणसं आहेत. म्हणजे मी महाराष्ट्राभर फिरतो.सगळीच माणसं गोड असतात, नाही असं नाही'
माझं गाव असल्यामुळे मी कोल्हापूर म्हणेन. पण खरंच पाहुणे भरपूर आहेत इथे.
आणि नेहमीच मला आमचं काहीही नसताना देखील आधार दिलाय. आज घर आहे सगळं आहे ही नंतरची गोष्ट आहे.
पण काहीही नसताना आपलेपणा भरपूर दिलाय. अजूनही आहे आमच्या पाहुणे पैमध्ये.'
भरत यांच्या आईवडिलांचं गाव हे कोल्हापूरचं होतं. त्यांचे वडील १९४७- ४८ मध्ये मुंबईत आले होते.
म्हणून झालेलं प्राजक्ता माळीचं ब्रेकअप; म्हणाली- मी त्याला रंगेहात...