मुंबई : भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करण्याच्या आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. वीजबंदी करण्याची वेळ आली तर त्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तातडीच्या खरेदीसाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन फंड आजच वितरित करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख सूचनाप्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा
जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा
वीजबंदी (ब्लॅकआऊट) बाबतची माहिती व अशावेळी काय करावे, याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा
सायबर विभागाने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवावी
शत्रूला मदत करणारी माहिती प्रसारित केल्यास कारवाई करा.
सैन्याच्या हालचालींचे चित्रीकरण करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
अद्ययावत व खरी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करा.
सायबर विभागाकडून त्वरित सायबर
ऑडिट करून घ्या