India Pakistan War : S-400 बद्दल पाकिस्तानी टीव्हीवर खोट्या बातम्या, सत्य काय ते जाणून घ्या
GH News May 10, 2025 01:07 PM

सध्या S-400 मिसाइल सिस्टिम भारताचा अभेद्या सुरक्षा कवच बनली आहे. या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचा प्रत्येक क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला परतवून लावलाय. या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिममुळेच पाकिस्तानला भारताच काहीही नुकसान करता आलेलं नाही. पाकिस्तानच्या साध्या रॉकेटपासून ते बॅलेस्टिक मिसाइलपर्यंत सर्व हल्ले S-400 ने यशस्वीरित्या परतवून लावले आहेत. त्यामुळे बदल्याच्या आगीत होरपळणाऱ्या पाकिस्तानला काय करावं, ते समजत नाहीय. S-400 मिसाइल डिफेन्स सिस्टिममुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. या मिसाइल सिस्टिमचा सामना कसा करायचा तेच पाकिस्तानला समजत नाहीय.

काल पाकिस्तानने त्यांचं घातक फतेह-1 बॅलेस्टिक मिसाइल भारताच्या दिशेने डागलं. पण भारताने हवेतच पाकिस्तानी मिसाइल नष्ट केलं. चवातळलेला पाकिस्तान मागच्या तीन दिवसांपासून हल्ल्याचा प्रयत्न करतोय. पण भारताची मजबूत मिसाइल डिफेन्स सिस्टिम त्यांचा एक प्रयत्न यशस्वी होऊ देत नाहीय. आता पाकिस्तानी मीडियामध्ये भारताची S-400 मिसाइल सिस्टिम नष्ट केल्याची चर्चा सुरु आहे.

पाकिस्तानच्या दाव्यात किती तथ्य?

आदमपूर येथे असलेली S-400 मिसाइल सिस्टिम नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पण पाकिस्तानकडून ही अफवा पसरवण्यात येत असून हा दावा खोटा आहे. भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. पाकिस्तानच्या हायपरसोनिक मिसाइलने S-400 मिसाइल सिस्टिम उद्धवस्त केल्याच वृत्त पाकिस्तानी PTV ने दिलं होतं. पण ही बातमी चुकीची आणि अफवा पसरवणारी आहे.

S-400 मिसाइल सिस्टिमच वैशिष्ट्य काय आहे?

S-400 मध्ये एकाचवेळी वेगवेगळ्या टार्गेटसना लक्ष्य करण्याची क्षमता आहे. शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर, मानवरहीत विमान आणि ड्रोन्सना नष्ट करते.

ही अँटी-बॅलिस्टिक मिसाइल सिस्टिम आवाजाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने हल्ला करते. या मिसालइल सिस्टिमची रेंज 400 किलोमीटर आहे. 400 किलोमीटर अंतरावरुनच ही सिस्टिम टार्गेट्चा अचूक वेध घेते.

जमिनीवरुन हवेत मारा करणारी ही रशियन मिसाइल प्रणाली 400 किमी अंतरावरील व 30 किमी उंचावरील लक्ष्याला नष्ट करण्यास सक्षम आहे.

शत्रूची मिसाइल किंवा विमानाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी ही क्षेपणास्त्र प्रणाली ते अस्त्र 400 किमी अंतरावर असतानाच नष्ट करु शकते.

भारताच्या या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने काल रात्री आपली अचूकता आणि क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानकडून होणारे मिसाइल आणि ड्रोन हल्ले परतवून लावले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.