India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. कोणत्याही क्षणी दोन्ही देशांत टोकाचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. असे असतानाच आता पाकिस्तानातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानातील लाहोर या महत्त्वाच्या शहरांत अनेक स्फोट झाल्याचे समोर आले आहे.
लाहोर हे शहर पाकिस्तानातील सर्वाधिक महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या शहराला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. मात्र सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थितीत याच शहरातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या शहरात सकाळपासून सलग स्फोट होत आहेत. या स्फोटाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
लाहोरमध्ये मोठे स्फोट होत आहेत. मध्यरात्रीपासून हे स्फोट होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लाहोरमधील औद्योगिक क्षेत्रातही स्फोट झालेला आहे. याआधीही लाहोरमध्ये अनेक स्फोट झाले होते. अगोदर या शहरात ड्रोन हल्ले झाले होते. रात्रीच्या अंधारात हे ड्रोन हल्ले झाले होते. या हल्ल्यानंतर लाहोर शहरात सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते. मुख्य रस्त्यांवरही काही स्फोट जाल्याचे पाहायला मिळाले.
सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरातील पेट्रोल पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 48 तासांसाठी या शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद असतील. पाकिस्तानातील इंधन तुटवडा हेदेखील यामागचं महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानवर हल्ले होत असले तरी या देशाच्या कुरापाती अद्याप संपलेल्या नाहीत. या देशाकडून भारतातील सीमाभागात हल्ले केले जात आहेत. युद्धजन्य स्थिती लक्षात घेता पाकिस्ताने आपले हवाईक्षेत्र बंद केलेले आहेत. भारताने लाहोरसह सियालकोट येथेदेखील हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराचे लॉन्च पॅड याच भागात होते. हेच लॉन्च पॅड भारतीय लष्कराने उडवले आहे.