नेरूळ, ता. १३ (बातमीदार) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती नेरूळ येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कपिलवस्तू बुद्ध विहार समितीचे सरचिटणीस एल. आर. गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण केल्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. तत्पूर्वी रविवारी कपिलवस्तू बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमेनिमित्त मोफत रक्ततपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा लाभ गरजू नागरिकांनी तसेच बौद्ध धम्म उपासक व उपासिकांनी घेतला. बुद्ध जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी सविता भिसे, कांचन गाडे, कविता कांबळे, उज्ज्वला पवार, अनंत पवार, अनंत तांबे, सुनील गाडे आदींनी सहकार्य केले.