वागळेत यंत्रणांची रंगीत तालीम
esakal May 13, 2025 09:45 PM

ठाणे, ता. १३ : पावसाळ्यात इमारती खचण्याच्या, पडण्याच्या शक्यता अधिक असतात. अशावेळी इमारतीत अडकलेल्या लोकांच्या बचावाकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची रंगीत तालीम सोमवारी (ता. १२) यशस्वी पार पडली. या वेळी वागळे इस्टेट परिसरातील पडवळनगर येथील तळ अधिक चार मजली लिकोडिया हाउस इमारतीत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, श्रीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे महापालिका आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी मदतकार्य केले. साधारण अर्धा तास रंगीत तालीम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.