टीम इंडियाला एका महिन्यानंतर इंग्लंडचा दौरा करायचा आहे. दोन्ही संघात 5 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात देखील तेव्हाच होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांनी रिटायरमेंट घेतल्यानंतर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत की, नक्की इंग्लंड दौऱ्यावर कोणकोणते खेळाडू जातील? मीडिया रिपोर्टनुसार 23 मे रोजी टीम इंडिया संघ घोषित केला जाऊ शकतो. पण त्याच्याआधी भारतीय कसोटीचा नवा कर्णधार कोण असेल? याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, शुबमन गिल भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार बनू शकतो. मागच्या काही दिवसांपासून कर्णधार पद कोणाला द्यायचं ह्या चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये रिषभ पंत, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांचे देखील नाव घेण्यात आलं होतं. पीटीआयनुसार शुबमन गिलने गौतम गंभीर यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये चार ते पाच तासांची चर्चा झाली. त्यामुळे हा दावा करण्यात येत आहे की, गंभीर यांनी निश्चित केलं आहे की, ते कर्णधार पदासाठी गिलची निवड करतील.
मागच्या दिवसांपासून जसप्रीत बुमराहला कसोटी कर्णधार बनवले जाईल,अशा चर्चा होत होत्या. पण सध्या तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे, बोर्डामध्ये काही उच्च अधिकारी शुबमन गिलला कर्णधार बनवण्याच्या निर्णयाने सहमत नाहीत. तरीसुद्धा या चर्चा होत आहेत की, गिलचं कर्णधार बनेल.
बुमराहबद्दल बोलायचे झाल्यास, तो मोठ्या दुखापतीतून सावरत आहे. वर्कलोड मॅनेजमेंटनुसार बुमराह इंग्लंडसाठी सर्व 5 कसोटी सामने खेळणे अवघड आहे. त्यामुळे त्याला कर्णधार बनवणार नाहीत. तसेच शुबमन गिलला भविष्यातील कर्णधाराच्या रूपात आधीपासूनच बघितले जात आहे. तो सध्या वनडे आंतरराष्ट्रीय संघाचा उपकर्णधार सुद्धा आहे.