‘द आर्ट ऑफ कॉन्फ्लुएन्स’ प्रदर्शन
मुंबई, ता. १७ ः हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी आणि द डिझाइनएरा गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द आर्ट ऑफ कॉन्फ्लुएन्स’ हे कलाप्रदर्शन द डिझाइन एरा गॅलरी, लोढा प्लेस, अप्पर वरळी येथे भरवण्यात आले आहे. अभिनेता आणि फोटोग्राफर लव एस. सिन्हा व फिल्ममेकर- फोटोग्राफर कुश एस. सिन्हा, अमृता देओरा यांनी हे प्रदर्शन भरवले आहे. उद्घाटनासाठी पूनम सिन्हा, छाया मोमाया, राएल पदमसी, डॉली ठाकोर, भूपल रामनाथकर, शांतनू हजारिका, परवेज दमानिया, अवीवा दमानिया, संगीता बबानी, समाजसेवक डॉ. अनील काशी मुरारका उपस्थित होते. या प्रदर्शनात डिजिटल आर्ट, फोटोग्राफी, शिल्पकला यांचा सुंदर संगम २६ मे २०२५ पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.