विराट कोहलीची क्रिकेटमधील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ख्याती आहे. त्याच्या फिटनेसमुळे धावा घेताना विराट कोहली सहज दिसतो. यावरून त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. विराट कोहली हा खाण्यापिण्याच्या बाबतीत नियमांचं पालन करतो. त्याच्याप्रमाणे त्याचे चाहतेही वागण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? विराट कोहली गाय किंवा म्हशीचं दूध पित नाही. त्याच्या आहारात या दुधाचा समावेश नाही. मग विराट कोहलीच्या डाएट प्लान कसा पूर्ण होतो असा प्रश्न तु्म्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. विराट कोहलीने 2018 मध्ये मांसाहार सोडला. तसेच शाकाहारी जेवण करतो. त्याने 2018 दक्षिण अफ्रिका दौऱ्यात हा निर्णय घेतला होता. तेव्हा कोहलीला आरोग्याची एक समस्या उद्भवली होती. त्यानंतर विराट कोहलीने मांसाहार सोडला आणि पूर्णपणे शाकाहारी जीवनशैली आत्मसात केली. त्याने यावेळी डेअरी उत्पादनं कमी केली.
विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याचा 90 टक्के डाएट हा उकडलेलं किंवा वाफवलेलं अन्न असतं. दुग्धजन्य पदार्थांचं सेवन कमी केलं आहे. कारण अनेकांना दुग्धजन्य पदार्थातील लॅक्टोज पचवणं कठीण होतं. त्यामुळे पोटफुगी आणि अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे विराट कोहलीने गाय आणि म्हशीच्या दुधाऐवजी प्लांट बेस्ड दुधाचा आहारात समावेश केला. मिडिया रिपोर्टनुसार, विराट कोहली बदामाचे दूध पितो. यात लॅक्टोज नाही वरून त्यात भरपूर पोषक तत्व आहेत. यात व्हिटॅमिन ई असल्याने फायदा होतो. कॅलरीज कमी असतात. सौम्य चवीमुळे स्मूदी किंवा कॉफीत वापरले जाऊ शकते. या दुधामुळे तंदुरूस्ती आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते.
आयपीएल स्पर्धेत विराट कोहली खेळत असलेला आरसीबी संघाचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित आहे. तीन पैकी एका सामन्यात सामन्यात विजय मिळवला तर थेट अंतिम फेरी गाठणार आहे. दुसरीकडे, विराट कोहलीही फॉर्मात आहे. विराटने 11 सामन्यात 63.13 सरासरीने 505 धावा केल्या आहेत. यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी 143.46 स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.