Sharad Pawar : खासदर संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. या प्रकाशन सोहळ्याला खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांनी या कार्यक्रमात भाषण करत सरकारच्या तसेच यंत्रणेच्या कामावर टीका केली. त्यांनी आपल्या या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
“संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होत आहे. या पुस्तकावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी बालसाहित्य वाचत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दिला. हाच संदर्भ घेत शरद पवार यांनी फडणीसांचे नाव न घेता टोला लगावला. संजय राऊत यांचं पुस्तक प्रसिद्ध होणार आहे, हे आपण गेल्या दोन दिवसांपासून ऐकत आहोत. मला आश्चर्य वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक न वाचता कसं समजलं? या पुस्तकावर प्रचंड टीका केली जात आहे. राऊतांवरही गेल्या दोन दिवसांपासून टीका केली जात आहे. कोणी सांगितलं की मी बालसाहित्य वाचत नाही. कोणी आणखी काही टीका केली,” असं शरद पवार म्हणाले.
सत्तेचा गैरवापर कसा होता हे राऊत यांच्या पुस्तकातून समजतं. तसं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ही यंत्रणा आहे ती कशी वागते याचं उत्तम लिखाण या पुस्तकात आहे. अनिल देशमुखांवर १०० कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोर्टात केस केली. त्यातला शंभरचा आकडा गेला. दोन शून्य गेली. एक कोटीचा आरोप केला, असं म्हणत सरकारने सूडभावनेतून ही कारवाई केली होती, असं शरद पवार म्हणाले.