चॉकलेटपासून बनवा ‘हे’ पाच फेस मास्क उन्हाळ्यात त्वचेसाठी ठरतील फायदेशीर
GH News May 19, 2025 09:05 AM

लहान मुले असोत किंवा मोठी माणसे सर्वांनाच चॉकलेट खायला आवडते. तसेच चॉकलेट आपल्या आरोग्यासाठीही खुप फायदेशीर आहे. त्याचबरोबर तुमचा मुड सुधारण्यासाठी तुम्ही चॉकलेटचे सेवन करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का की चॉकलेट तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यास देखील मदत करू शकते? चॉकलेटपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार बनते. हे फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावरील सर्व घाण काढून टाकतात आणि त्वचा स्वच्छ आणि नितळ बनवतात. म्हणून पुढच्या वेळी चॉकलेट खाण्यासोबतच यापासून फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावायला विसरू नका.

पण तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील जसे की चॉकलेट तुमच्या त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे, तुमच्या चेहऱ्यावर लावणे सुरक्षित आहे का? तर या लेखात तुम्ही चॉकलेटला तुमच्या स्किन केअरचा एक भाग कसा बनवू शकता ते जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या त्वचेची चमक अबाधित राहील.

चॉकलेट त्वचेसाठी का फायदेशीर आहे?

डार्क चॉकलेटमध्ये कॅटेचिन, पॉलीफेनॉल, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्हनॉल असतात. तसेच यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स कोलेजन उत्पादनात देखील मदत करतात. जे तुम्हाला चमकदार त्वचा देते.

चॉकलेटपासून बनवा हे 5 फेस मास्क

डार्क चॉकलेट फेस मास्क

हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 डार्क चॉकलेट, 4-5 चमचे दूध, 3 चमचे ब्राऊन शुगर आणि 1 चमचा मीठ घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये दुध घेऊन त्यात चॉकलेट वितळवा आणि त्यात मीठ आणि साखर मिक्स करा. तयार फेसपॅक थंड झाल्यावर 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यास मदत करतो.

चॉकलेट आणि केळीचा फेस मास्क

चॉकलेट आणि केळीचा फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे कोको पावडर, 1 चमचा मध, अर्धा कप मॅश केलेले केळे आणि 1 चमचा दही घ्या. हे सर्व पदार्थ मिक्स करा. त्यानंतर त्याची पेस्ट बनवा आणि ती तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे तो तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करतो.

चॉकलेट आणि ओट्स फेसमास्क

हा फेस मास्क बनवण्यासाठी अर्धा कप कोको पावडर, 3 चमचे ओट्स, 1 चमचा क्रीम आणि मध घेऊन सर्व पदार्थ मिक्स करा. आता तयार फेसपॅक चेहऱ्यावर आणि मानेवर 20 मिनिटे लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हा फेस मास्क वापरू शकता.

चॉकलेट आणि बेसनाचा मास्क

हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे बेसन, 1 चमचा दही, अर्धा कप कोको पावडर आणि अर्धा लिंबू घ्या. हे सर्व पदार्थ मिक्स करा आणि नंतर हा फेस मास्क चेहऱ्यावर 30 मिनिटे लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करते.

चॉकलेट आणि हळदीच्या फेस मास्कने मिळवा चमकदार त्वचा

हा मास्क बनवण्यासाठी 2 चमचे कोको पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि 2 चमचे दूध एकत्र करून चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा. यामुळे तुम्हाला निर्दोष आणि चमकदार त्वचा मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.