मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरात सापडला अजगर
कळवा, ता. २० (बातमीदार) : मुंब्रा येथील रेल्वेस्थानक परिसरात मुंब्रा देवी रस्त्यावर मिनी पॅलेस बारजवळ सापडल्याची घटना सोमवारी (ता. १९) रात्री ११ वाजता घडली. या परिसरात अजगर साप पाहिल्याची माहिती येथील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन या प्राणिमित्र संस्थेला दिली. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी या अजगर सापाला पकडून मुंब्र्याच्या जंगलात सुरक्षित सोडून दिले आहे.