Jyoti Malhotra Pakistani Spy News : ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानसोबतचा कट उघड, काय होतं संपूर्ण षडयंत्र, चॅटमधून उघड
Marathi May 21, 2025 02:25 AM

Jyoti Malhotra Pakistani Spy News : ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानसोबतचा कट उघड, काय होतं संपूर्ण षडयंत्र, चॅटमधून उघड

ज्योती मल्होत्रा: यूट्युबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. त्यात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यातलं एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आलंय. त्यात अटारीवर एखाद्या अंडर कव्हर एजंटबाबत माहिती काढण्याचं काम ज्योतीवर आयएसआयने सोपवलं होतं हे दिसून येतंय. अंडर कव्हर एजंटला भूलवून त्याला एका गुरूद्वारात नेण्याचे आदेश अली हसन ज्योतीला देत असल्याचं या चॅटमधून उघड होतंय. पाकिस्तानी आयएसआय ही संघटना ज्योतीचा वापर भारतीय गुप्तहेरांची माहिती काढण्यासाठी करत असल्याचे हे पुरावे आहेत.

ज्योती मल्होत्राने घरात लिहिली होती एक चिठ्ठी-

ज्योती मल्होत्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस रविवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास तिला घरात घेऊन गेले होते. यावेळी ज्योतीने घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी तिने घरातील मोलकरणीला लिहिली होती. ‘सविता को कहना फ्रूट ला दे। घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी।’ असं ज्योतीने या चिठ्ठीत लिहिलं होतं. तसंच एका औषधाचं आणि डॉक्टरचं नाव आणि शेवटी लव यू.. खुश-मुश, असं लिहिलं आहे.

पाकिस्तानसह चीनलाही जाऊन आलीय ज्योती मल्होत्रा-

हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्यूएन्झर्सशीही संपर्क असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी सुरु आहे. कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली. तर  इतर इन्फ्ल्यूएन्झर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते. तसेच पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.