बीड गुन्हा: बीडच्या परळी (Parli) येथे शिवराज दिवटे (Shivraj Divate) या तरुणाला समाधान मुंडेच्या (Samadhan Munde) गँगकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती. टोळक्याकडून आधी शिवराज याचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली, बांबू आणि काठीनं मारहाण करण्यात आली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दिवटेला मारहाण करणारा समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच शिवराज दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. आता समाधान मुंडेच्या आईने माझ्या मुलाला मारहाण करणारा शिवराज दिवटेच असल्याचा दावा केला आहे.
समाधान मुंडेच्या आईने म्हटले आहे की, माझा मुलगा गाडीवरून जात असताना त्याच्या गाडीची चावी घेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. माझ्या मुलावर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, जी कारवाई झाली तीच कारवाई त्यांच्यावर देखील दाखल व्हावी, अशी मागणी समाधान मुंडेच्या आईने केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा शिवराज दिवटे आहे, असा दावा देखील समाधान मुंडेच्या आईने केला आहे.
माझ्या मुलाला लाथा बुक्क्यांनी केस धरून मारहाण करण्यात आली. यावेळी शिवराज दिवटे हा देखील मारायला होता. या मारहाणीनंतर माझ्या मुलाने त्याला मारहाण केली. माझ्या मुलाने याची तक्रार द्यायला पाहिजे होती, हेच त्याचे चुकले. माझ्या मुलाला मारहाण करणारे सगळे मोठे माणसं आहेत. याबाबत मी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान, परळीतील जलालपूर येथे जमावाकडून समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्याची घडली होती, या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात भागवत साबळे व सुरेश साबळे याच्या विरोधात समाधान याच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरी याला सोडण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना जलालपूर येथे चौकामध्ये भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांना अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने काठी लाथा बुक्क्या व बेल्टने मारहाण केल्याची या तक्रारीत म्हटले आहे. आता या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..