Nitesh Rane suspends Nashik’s errant Fisheries Assistant Commissioner P. Da. Jagtap
Marathi May 21, 2025 02:25 AM


आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र. दा. जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे. वरिष्ठांची दिशाभूल करून देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आजारपणाच्या नावाखाली विदेशात सैर करायला गेलेल्या सहाय्यक आयुक्त जगताप यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

मुंबई : आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र. दा. जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे. वरिष्ठांची दिशाभूल करून देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आजारपणाच्या नावाखाली विदेशात सैर करायला गेलेल्या सहाय्यक आयुक्त जगताप यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. (Nitesh Rane suspends Nashik’s errant Fisheries Assistant Commissioner P. Da. Jagtap)

राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या. तथापि शासकीय कामाकरता नाशिकचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप हे इगतपुरी न्यायालयात असताना त्यांची शुगर कमी झाल्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आल्याचे व शुद्धीवर आल्यानंतर दवाखान्यात जावे लागल्याने नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाकडे अर्धा दिवस किरकोळ रजेचा अर्ज सादर करून तब्येत बरी नसल्याचे त्यांनी भासवले होते. मात्र प्रत्यक्षात ते विदेशवारीवर गेल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – ST Bus Accident : ब्रेक फेल झाल्याने एसटी बसने चौघांना उडवले; 2 ठार, तर दोघे गंभीर जखमी

या घटनेत जगताप यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, कार्यकर्त्यव्या वर गैरहजर असणे आणि वरिष्ठांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कारवाईचा बडगा उचलत मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर आज (20 मे) निलंबनाची कारवाई करण्यात आली.

बडतर्फीचीही कारवाई होण्याची शक्यता

निलंबन आदेशात जगताप हे निलंबित असेपर्यंत मत्स्य व्यवसाय नागपूर प्रादेशिक उपायुक्त यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत. तसेच त्यांचे मुख्यालय चंद्रपूर हे राहील, असेही स्पष्टपणे बजावण्यात आले आहे. या आधी दोनवेळा या अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने कारवाई केली होती. त्यामुळे त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश मंत्री राणे यांनी दिले असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर बडतर्फीची ही कारवाई करणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

हेही वाचा – Pune Hoarding collapse : मुंबईतील होर्डिंगच्या घटनेची पुण्यात पुनरावृत्ती, सुदैवाने जीवितहानी टळली


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.