तुम्हाल स्कूटर खरेदी करायची आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. एनटॉर्क 125 मध्ये एलईडी लाइटिंग, मल्टिपल लॅप टाइमिंग फीचर्ससह डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अलर्ट आणि व्हॉईस असिस्टसह ब्लूटूथ अॅप्लिकेशन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन असिस्ट, ट्रिप रिपोर्ट, ऑटो एसएमएस रिप्लाय आणि पार्किंग ब्रेक देण्यात आले आहेत. चला तर मग याविषयी पुढे विस्ताराने माहिती जाणून घेऊया.
टीव्हीएस एनटॉर्क 125 ने अनेक विक्रम करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. टीव्हीएस एनटॉर्क 125 ने 4 मे रोजी नोएडाच्या सेक्टर-38 येथून प्रवासाला सुरुवात केली आणि 15 तासांपेक्षा कमी वेळात सुमारे 1000 किमीचा प्रवास पूर्ण करत पहिला विक्रम मोडला. अनेक रायडर्सनी 24 तासात 1618 किलोमीटरचा प्रवास करत दुसरा विक्रम मोडला. ही स्कूटर दिल्ली-आग्रा, आग्रा-लखनौ आणि लखनौ-आझमगडसह अनेक एक्स्प्रेस वेवरून गेली.
टीव्हीएस एनटॉर्क इंजिन 125 सीसी, 3-व्हॉल्व्ह सीव्हीटीआय-रेव्ह तंत्रज्ञान आहे. हे इंजिन 7,000 आरपीएमवर 10 बीएचपीपॉवर आणि 5,500 आरपीएमवर 10.9 एनएम टॉर्क जनरेट करते. याची टॉप स्पीड 98 किमी प्रति तास असून 8.6 सेकंदात 0 ते 60 किमी प्रति तास वेग पकडू शकते.
एनटॉर्क 125 फीचर्स
एनटॉर्क 125 मध्ये एलईडी लाइटिंग, मल्टिपल लॅप टाइमिंग फीचर्ससह डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अलर्ट आणि व्हॉईस असिस्टसह ब्लूटूथ अॅप्लिकेशन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन असिस्ट, ट्रिप रिपोर्ट, ऑटो एसएमएस रिप्लाय आणि पार्किंग ब्रेक देण्यात आले आहेत. रेस आणि स्ट्रीट मोडसह रायडिंग मोडदेखील देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये इंजिन किल स्विच, लो फ्यूल इंडिकेटर एलईडी आणि हॅजार्ड लॅम्प आहेत.
एनटॉर्क 125 चे डिझाइन
सस्पेंशनमुळे स्कूटरला 155 एमएमची ग्राउंड क्लिअरन्स मिळते. समोर हायड्रोलिक डॅम्परसह टेलिस्कोपिक आणि मागच्या बाजूला हायड्रोलिक डॅम्परसह कॉइल स्प्रिंग्स आहेत. ब्रेकिंग ड्युटीमध्ये फ्रंटमध्ये 220 मिमी रोटो-पेटल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम प्रकारचे ब्रेक देण्यात आले आहेत.
एनटॉर्क 125 किंमत
या विक्रमासाठी एनटॉर्क रेस एक्सपी व्हेरियंटचा वापर करण्यात आला आहे, जो उपलब्ध टॉप व्हेरियंटपैकी एक आहे. एनटॉर्क डिस्क, रेस एडिशन, सुपर स्क्वॉड आणि एक्सटी सह इतर चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या परफॉर्मन्स ओरिएंटेड स्कूटरची किंमत 87,542 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि टॉप-स्पेक एक्सपी व्हेरियंटची किंमत 1.07 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) जाते.