सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवी हगवणेने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून स्वत:चे आयुष्य संपवले असे म्हटले जात आहे. पण तिची हत्या झाल्याचा दावा वैष्णवीच्या घरचे करत आहेत. हुंड्यापायी वैष्णवीचा जीव गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान वैष्णवीचा जाऊ मयुरीने हगवणे कुटुंबाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. तिने अनेक गौप्यस्फोट देखील केले आहेत.
'वैष्णवीप्रमाणे मलाही सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यात आला. लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याला कायम दुय्यम वागणूक दिली. ही पोरगी आगाऊ आहे, तिला सोडून दे, श्रीमंत घराण्यातील मुलगी तुला सहज मिळून जाईल असे माझ्या नवऱ्याला सांगायचे. पण माझ्या नवऱ्याने माझी कायम साथ दिली. जाऊ असूनही आम्हा दोघींना () एकत्र बोलू दिले नाही. वैष्णवीला मारहाण व्हायची. तिचा नवरा येऊन मला मारायचा म्हणून मी काहीच करु शकले नाही', असे मयुरीने म्हटले आहे.
वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणेला झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीचे फोटो समोर आले आहेत. याबाबतही मयुरीने माहिती दिली. 'मला मारहाण झाली तेव्हा मी याबाबत महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पण महिला आयोगाने तक्रार नोंदवून घेतली. मात्र पुढे काहीच झाले नाही', असे मयुरी हगवणेने सांगितले.
घरामध्ये माझा नवरा आणि दीर यांच्याकडे आहेत. सासऱ्याची दहशत असल्याने पोलीस देखील कारवाई करत नव्हते. माझ्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती, तर आता वैष्णवीला काही झाले नसते. ते लोक पोलिसांनाही घाबरत नव्हते. सासू, सासरे, दीर, नणंद या चौघांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. मी वैष्णवीचे बाळ सांभाळायला तयार आहे. मोठ्या सासऱ्यांना मी बोललेही होते. माझा कस्पटे कुटुंबाल पाठिंबा आहे,असे वक्तव्य मयुरीने केले आहे.