पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ रशिया दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाचे विमान मॉस्को विमानतळावर उतरण्यापूर्वीच युक्रेन देशाने रशियावर ड्रोन हल्ला चढवला. ड्रोन हल्ल्यामुळे भारतीय विमान उतरवण्यास काही काळ बंदी घालण्यात आली. भारतीय खासदारांचे विमान काही मिनिटे हवेतच घिरट्या घालत राहिले. भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ मोठ्या संकटातून वाचले. रशियाच्या दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडलाचे दैव बलवत्तर म्हणावे लागेल. मॉस्को विमानतळावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला. नंतर काय झाले पुढे?
मॉस्को विमानतळ काही काळ बंद
पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्यासाठी डीएमकेच्या खासदार कनिमोई यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मॉस्कोला पाठवण्यात आले आहे. या शिष्टमंडळाचे विमान मॉस्को विमानतळावर उतरणार तोच यु्क्रेनने मॉस्कोसह विमानतळावर ड्रोन हल्ले केले. त्यामुळे भारतीय विमानतळ उतरण्यास काही मिनिटे थांबवण्यात आले. मॉस्कोच्या विमानतळावर विमाने ये जा करण्यास बंदी घालण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समोर येताच ग्रीन सिग्नल मिळाले आणि शिष्टमंडळाचे विमान उतरले.
भारतीय राजदूतांनी केले स्वागत
फ्लाईट लँड झाल्यानंतर सर्व खासदारांचे मॉस्कोतील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी स्वागत केले. हे शिष्टमंडळ या दौऱ्यात रशियन सरकार, त्यांचे ज्येष्ठ खासदार, अधिकारी आणि तिथल्या तज्ज्ञांना पाकिस्ता पुरस्कृत दहशतवाद, दहशतवाद्यांची माहिती देईल. रशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासूनच चांगले असल्याचे कनिमोई म्हणल्या. पाकिस्तान हा जगासाठी कसा धोका आहे, हे आम्ही रशियाला सांगू असे त्या म्हणाल्या.
पुतिन यांनी अगोदरच व्यक्त केली होती भीती
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी ज्यावेळी ही इतर देशांचे सरकारी शिष्टमंडळ रशियाच्या दौऱ्यावर असते, त्यावेळी यु्क्रेन मॉस्कोवर ड्रोन हल्ला करतो, असे त्यांनी सांगितले होते. पुतिन यांची भीती याहल्ल्याने खरी ठरल्याचे दिसून आले. पुतिन यांच्या मते, युक्रेनने मुद्दाम हा हल्ला केला आहे. जगाचा रशियाशी संपर्क होऊ नये, भीतीपोटी रशियात कोणी येऊ नये हा त्यामागील हेतू असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.