Mumbai-Goa Highway : 'मुंबई-गोवा महामार्गावरील काम अत्यंत संथ गतीने'; वांद्री गावात अपघातांचे प्रमाण वाढले
esakal May 25, 2025 07:45 PM

रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गावात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामाच्या धिम्या आणि असुरक्षित पद्धतीमुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मातीचे उत्खनन करताना ती माती पूर्ण रस्त्यावर साचल्यामुळे रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे.

परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसात रस्ता अधिकच निसरडा होत आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अपुरे सुरक्षा उपाय आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे काम पूर्ण होण्याऐवजी धोका वाढत आहे. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून कामाची गती वाढवावी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.