चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला. चेन्नईने यासह या हंगामाचा शेवट विजयाने केला. चेन्नईने गुजरातवर मात केली. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुजरातचे फलंदाज निष्प्रभ ठरले. चेन्नईने गुजरातला 147 धावांवर गुंडाळलं. चेन्नईने अशाप्रकारे 83 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. चेन्नईचा शेवटच्या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्तीबाबत काय बोलणार? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. धोनीने जाता जाता निवृत्तीवर भाष्य केलं. तसेच चाहत्यांना संदेश दिला.
“आज हाऊसफुल होतं असं मी म्हणणार नाही. आमच्यासाठी हा हंगाम चांगला राहिला नाही. मात्र आजचा विजय सर्वोत्तम विजयापैकी एक होता. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 4-5 महिने आहेत, काहीही घाई नाही. शरीर फिट ठेवण्याची गरज आहे. सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. क्रिकेटपटू जर कामगिरीमुळे निवृत्त होणार असतील तर त्यापैकी काही 22 व्या वर्षी निवृत्ती होतील”, असं धोनीने गुजरात विरुद्धच्या सामन्यानंतर म्हटलं.
“मी रांचीत पुन्हा जाईन, बाईक राईडचा आनंद घेईन. माझं काम पूर्ण झालंय असं मी म्हणत नाही. तसेच मी पुन्हा येईन असंही म्हणत नाही. माझ्याकडे फार वेळ आहे. निवृत्तीबाबत विचार करेन आणि त्यानंतरच निर्णय घेईल. जेव्हा हंगामाला सुरुवात झाली तेव्हा 4 सामने चेन्नईत होते. काही उणीवा आहेत. ती भरुन काढावी लागेल. ऋतुराज गायकवाड याला पुढील हंगामात अनेक गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही”, असंही धोनी याने नमूद केलं.
चेन्नईसाठी डेव्हॉन कॉनव्हे याने 52 धावांचं योगदान दिलं. तर डेवाल्ड ब्रेव्हीस याने सर्वाधिक 57 रन्स केल्या. तसेच उर्विल पटेल याने 37 तर आयुष म्हात्रे याने 34 धावांचं योगदान दिलं. या चौघांसह इतरांनी दिलेल्या योगदानामुळे चेन्नईने 230 धावा केल्या.
त्यानतंर विजयी धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या गुजरातने कर्णधार शुबमन गिल याच्या रुपात पहिली विकेट गमावली. शुबमन 13 रन्स करुन आऊट झाला. हैदराबादने पावरप्लेमध्ये 35 धावांत 3 विकेट्स गमावल्या. साई सुदर्शन 10 ओव्हरपर्यंत टिकून होता. मात्र तो ही आऊट झाला. साईच्या रुपात गुजरातने पाचवी विकेट गमावली. साई आणि शाहरुख खान या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 55 रन्सची पार्टनरशीप केली. या व्यतिरिक्त गुजरातकडून कोणत्याही जोडीला भागीदारी करता आली नाही. त्यामुळे गुजरातचा पराभव झाला.