Jojoba Oil : पिंपल्सपासून सुटका देणारे जोजोबा ऑइल
Marathi May 31, 2025 10:26 PM

पावसाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा कोरडी पडणे, खाज येणे अशा त्वचेच्या तक्रारी सुरू होतात. या तक्रारींमुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. या तक्रारी कमी करण्यासाठी बाजारातील विविध स्किनकेअर प्रॉडक्ट वापरले जातात. मात्र, कित्येकदा हे महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट वापरून हवा तसा परिणाम मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचेच्या तक्रारींपासून सुटका होण्यासाठी विशेष करून पिंपल्सपासून.. जोजोबा ऑइल वापरायला हवे. जोजोबा ऑइल त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. याच्या रोजच्या वापराने पिंपल्स कमी होतात आणि इतर अनेक तक्रारी कमी होतात. आज आपण जाणून घेऊयात जोजोबा ऑइलचे त्वचेला होणारे फायदे काय आहेत.

जोजोबा ऑईल म्हणजे काय?

जोजोबा ही वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. या वनस्पतीच्या बिया नट्सच्या आकाराच्या असतात. या बियांमध्ये सुमारे 50 % तेल असते. हे ऑइल प्रामुख्याने स्किन आणि केसांसाठी वापरले जाते. जोजोबा ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, सिलिकॉन, झिंक, क्रोमियम आणि कॉपर यांसारखी पोषकतत्वे असतात.

पिंपल्सपासून सुटका होते –

वातावरणातील बदल, बिघडलेली पचनक्रिया आणि इतर कारणांमुळे त्वचेवर येणारे पिंपल्सपासून सुटका होण्यासाठी जोजोबा ऑइलचा वापर करावा. या तेलामुळे त्वचेवरील सर्व पिंपल्सचे डागही निघून जातात.

जोजोबा ऑइलचे इतर फायदे –

  • त्वचेमधील ओलावा कायम राहण्यासाठी जोजोबा ऑइल उपयुक्त प्रॉडक्ट आहे. यामुळे त्वचा चमकदार होण्यासाठी मदत होते.
  • कोरड्या त्वचेवर उपाय शोधत असाल तर जोजोबा ऑइलचा वापर करावा.
  • जोजोबा ऑइलच्या सततच्या वापरामुळे त्वचेवरील सूज कमी होते.
  • वाढत्या वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी जोजोबा ऑइल उत्तम पर्याय आहे.
  • जोजोबा ऑइलमुळे एक्झिमा आणि सोरायसिससारख्या त्वचेसंबंधी समस्या कमी होतात.
  • जोजोबा ऑइलमधील ऍटी-बॅक्टेरियल आणि ऍटी-फंगल गुणधर्म त्वचा स्वच्छ करतात.
  • जोजोबा ऑइलमधील व्हिटॅमिन्स आणि आयर्न्स त्वचेला पोषण देतात.
  • त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी जोजोबा ऑइल उत्तम पर्याय आहे. जोजोबा ऑइल त्वचेला आतपर्यंत ओलावा देता, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.
  • जोजोबा ऑइल लिपबाम म्हणून वापरता येईल. यामुळे ओठ मऊ राहण्यासाठी मदत मिळेल.
  • मेकअप रिमूव्हर म्हणून या ऑइलचा वापर करता येईल. यामुळे कोणतेही साइड इफेक्ट्स त्वचेवर होणार नाहीत.

 

 

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.