Electric Geyser :गिझर वापरताना घ्या ही काळजी
Marathi June 08, 2025 09:28 PM
पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे गरम पाण्याने अंघोळ केली जाते. कारण थंड वातावरणात गरम पाण्याच्या आंघोळीची मज्जा काही वेगळीत असते. काही घरांमध्ये आजही गॅसवर पातेल्यात पाणी तापवले जाते तर काही घरात गिझरचा वापर केला जातो. पण, गिझरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात घ्यायल्या हव्यात, कारण गीझरचा स्फोट होण्याची शक्यता असते. दिवसेंदिवस तर गिझरचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात पावसाळ्यात गिझर वापरताना काय काळजी घ्याल.
- अनेकजण गरम पाणी करण्यासाठी गिझर वापरतात. पण, वापरून झाल्यावर गिझर बंद करण्यास विसरतात. पण, ही चूक महागात पडू शकते. अशाने गिझरचा स्फोट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही अटोमॅटीक गिझर वापरायला हवा.
- दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिझर कायम उंचीवर असायला हवा. ज्यामुळे शॉक लागण्याची शक्यता कमी होते. याशिवाय घरातील लहान मुले गिझर हाताळू शकतात, जे धोकादायक आहे.
- गिझरची तार तांब्याची नसल्यास स्फोट होऊ शकतो. त्यामुळे गिझरची अर्थिंग व्यवस्थित आहे का नाही? हे कायम चेक करावे.
- गिझर उत्तम मॅकेनिककडून बसवून घ्यावा. स्वत: बसवायचा प्रयत्न करू नका.
- स्वस्त गिझर वापरू नये, अनेकांना पैसे वाचवण्यासाठी स्वस्त गीझर वापरण्याची सवय असते. पण, अशी चूक करू नये.
- गिझर खरेदी करताना वेळोवेळी सर्विसिंग करून घ्यावी.
- गिझर खरेदी करताना त्यावरील सुचना व्यवस्थित वाचाव्यात.
- गिझरचा शॉक टाळण्यासाठी 10 ते 15 मिनिटे आधीच गिझर सुरू करावा आणि पाणी गरम करावे.
- सर्वात शेवटची आणि महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हाही तुम्ही गिढर सुरू करता तेव्हा त्यात पाणी असणे आवश्यक आह. कारण पाण्याशिवाय गिझर सुरू केल्याने स्फोट होऊ शकतो.
हेही पाहा –