यू.पी. जद(यू)च्या उपाध्यक्षा शालिनी पटेल यांचा मुलुंडमध्ये सन्मान
मुलुंड, ता. ८ (बातमीदार)ः मुंबई जनता दल (यू)च्या उत्तर प्रदेश राज्य उपाध्यक्षा शालिनी सिंह पटेल यांच्या मुंबई आगमनानंतर मुलुंड पश्चिम येथील केशव पाडा येथे शुक्रवारी (ता. ३०) एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक जगदीश सिंह पटेल, डॉ. बाबूलाल सिंग पटेल, समाजवादी पक्षाचे मुंबई सरचिटणीस रमाशंकर तिवारी, महाराष्ट्र काँग्रेसचे उत्तर भारतीय सेलचे सरचिटणीस डॉ. आर. एम. पाल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राममूर्ती वर्मा, बी. चक्रवर्ती यांनी शालिनी पटेल यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या सन्मानाबद्दल त्यांनी मुलुंडमधील सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.