मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात; एक गंभीर तर दोन किरकोळ जखमी
esakal June 21, 2025 02:45 AM

महामार्गावर अपघात; एक गंभीर, दोन जखमी
मनोर, ता. २० : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात कारचालक जखमी झाला, तर दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या भरधाव वेगातील कार शुक्रवारी (ता. २०) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास
वाडा खडकोना गावाच्या हद्दीत पोहोचली. या वेळी डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती तिसऱ्या मार्गिकेवरील उभ्या ट्रकला धडकली. जगतदीप स्वरूप (वय २९), सोमदीप शेखावत (३९) आणि विकास गिरी (३१) अशी जखमींची नावे आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.