पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा विजयी झाल्याने या रिक्त जागी आपण राज्यसभेवर जाणार नाही, असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आज स्पष्ट केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काहीसे बाजूला पडलेले अरविंद केजरीवाल यांनी आज गुजरातमधील विसावदर आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम या विधानसभा मतदार संघांमध्ये आपने पोटनिवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदा उत्साहात प्रसारमाध्यमांसमोर आले.
अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, विसावदरचा निकाल म्हणजे नागरिक भाजपच्या ३० वर्षांच्या कुशासनाला कंटाळली आहे हे दर्शविणारा आहे. गुजरातमध्ये भाजपची असलेली पकड लक्षात घेता तेथील विजय महत्त्वाचा असून यापुढे भाजप आणि आपमध्ये थेट टक्कर असेल.
Shaktisinh Gohil : पोटनिवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत शक्तिसिंह गोहिल यांचा राजीनामा!केजरीवाल म्हणाले, की गुजरातमध्ये दोन जागांवर निवडणूक झाली होती. भाजप आणि काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. तरी देखील आपने ऐतिहासिक विजय मिळवला आणि भाजपला दुसरी जागा जिंकता आली.