भारतीय बाजारात सध्या एसयुव्ही सेगमेंटच्या वाहनांना अधिक मागणी आहे. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्यांच्या एसयुव्ही आहेत, हुंडई कंपनीची क्रेटा एसयुव्ही याच सेगमेंटमध्ये आहे. Hyundai Creta एसयुव्हीने पहिल्या सहामाहीत सर्वाधिक पसंतीची कार होण्याचा मान मिळवला आहे.
हुंडई मोटर इंडियाने मिड साईज एसयुव्ही म्हणून Hyundai Creta ची विक्री केली जाते. निर्मात्यांच्या मते या एसयुव्हीला साल 2025च्या पहिल्या सहामाहीत सर्वाधिक पसंद केले जात आहे.याच सोबत या एसयुव्हीला पहिल्या सहामाहीच्या पहिल्या तीन महिन्यात( मार्च, एप्रिल, जून ) देखील बेस्ट सेलिंग एसयुव्हीचा मान मिळाला होता.
हुंडई मोटर इंडियाचे सीओओ तरुण गर्ग यांनी म्हटले आहे की CRETA केवळ एक उत्पादन नाही, ही 12 लाखांहून जास्त भारतीय कुटुंबियांची एक भावना आहे. गेल्या एक दशकात CRETA ने लागोपाठ SUV स्पेसला नव्याने परिभाषित केले आहे. भारतात Hyundai ने विक्रीचा नवा विक्रम केला आहे. जून 2025 मध्येही सर्वाधिक विक्री झालेले मॉडल बनने, हे भारतीय ग्राहकांना या ब्रँडला दिलेले प्रेमाचे प्रतिक आहे.
हुंडईने क्रेटा एसयुव्हीत अनेक फिचर्स दिले आहेत. या एसयुव्हीत 17 इंचाचे अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाईट्स, एलईडी डीआरएल, सीक्वेंशल टर्न इंडीकेटर, शॉर्क फिन एंटेना, ड्यूल टोन एक्सटीरियर आणि इंटीरियर, लेदर सीट्स, रियर विंडो सनशेड, पॅनॉरमिक सनरूफ, ड्यूल झोन ऑटो एसी, फ्रंट वेंटिलेटिड सीट्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, वायरलेस फोन चार्जर, ईको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड्स,स्नो, मड आणि सँड ट्रॅक्शन मोड्स, क्रूझ कंट्रोल, की-लॅस एंट्री, फ्रंट कंसोल आर्मरेस्टसह स्टोरेज, रिमोट इंजिन स्टार्टसह स्मार्ट की, इलेक्ट्रिक टेलगेट रिलीज, रिअर एसी वेंट्स, रियर वायपर आणि वॉशर, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग व्हील, आयएसजी, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, 10.25 इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम, बोस कंपनीचे 8 स्पीकर ऑडिओ सिस्टीम, एंड्रॉईड ऑटो, एप्पल कार प्ले, 10.25 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ब्लूलिंक तंत्र, ओटीए अपडेट्स, ‘होम टू कार’ सह अॅलेक्सासारखे फीचर्स आहेत.
Hyundai Creta इंजिनात तीन पर्याय आहेत, ज्यात 1.5 लिटर पेट्रोल नेच्युरल एस्पिरेटिड इंजिनपासून 115 पीएस पॉवर आणि 143.8 न्यूटन मीटर टॉर्क मिळते. दुसरे पेट्रोल इंजिन 1.5 लिटरचे टर्बो इंजन असून त्यात 160 पीएस पॉवर आणि 253 न्यूटन मीटरचे टॉर्क देते. तिसरा पर्याय म्हणून 1.5 लिटर क्षमतेचे डीझेल इंजन मिळते. त्यापासून 116 पीएसची पॉवर आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो.या पर्यायांसोबत 6 स्पीड मॅन्युअल, आयव्हीटी, ऑटोमॅटीक आणि 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.
हुंडईच्या वतीने क्रेटाला पेट्रोलसह डीझेल इंजिनही ऑफर केले आहे. निर्मात्यांनी या एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 11.10 लाख रुपयांनी सुरुवात होते. याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 20.50 लाख रुपय आहे.
हुंडईची क्रेटाला मिड साईज एसयूव्ही म्हणून सादर केले आहे. हुंडईच्या या एसयुव्ही कारचा बाजारात थेट मुकाबला Honda Elevate, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder, Tata Harrier, Mahindra Scorpio, MG Hector सारख्या एसयुव्हीशी टक्कर आहे.