दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग 11 पाहून रवि शास्त्री यांचं डोकं फिरलं, गंभीर-गिलला थेट विचारला असा प्रश्न
GH News July 02, 2025 08:07 PM

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याचं मोठं आव्हान आहे. पण दुसऱ्या कसोटीतही नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. केएल राहुल फक्त 2 धावा करून तंबूत परतला. पण नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर शुबमन गिलने प्लेइंग 11 जाहीर केली. यानंतर माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण या प्लेइंग 11 मध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्थान नव्हतं. रवि शास्त्री यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रवि शास्त्री यांनी स्पष्ट सांगितलं की, या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह फिट होता तर त्याने हा सामना खेळायला हवा होता.

रवि शास्त्री यांनी जियो हॉटस्टारवर बोलताना सांगितलं की, ‘बुमराहची निवड प्लेइंग 11 मध्ये न होणं खूपच आश्चर्यकारक आहे. जर बुमराह खेळण्यासाठी फिट होत तर त्याबाबत असा निर्णय घेणं विचित्र आहे. हा महत्त्वाचा कसोटी सामना आहे आणि यात विजय महत्त्वाचा आहे. जसप्रीत बुमराह एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. काही सांगायची गरज नाही. या सामन्यात बुमराह खेळायला हवा होता.’ भारताने हा सामना गमावला तर मालिका गमवण्याची सावट तिसऱ्या सामन्यापासून सुरु होईल. त्यामुळे भारतावर आणखी दबाव वाढेल.

टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल याने सामन्याच्या एक दिवस आधी जसप्रीत बुमराह या सामन्यासाठी फिट असल्याचं सांगितलं होतं. तसेच जर बुमराह खेळला नाही तर त्यांच्याकडे 20 विकेट घेण्याचा पर्याय आहे. दरम्यान प्लेइंग 11 घोषणा झाली तेव्हा शुबमन गिलने बुमराहच्या जागी आकाशदीपला संघात संधी दिली आहे. आकाशदीप चेंडू स्विंग करण्यात माहिर आहे. तसेच साई सुदर्शन आणि शार्दुल ठाकुर यांना बसवलं आहे. या दोघांची कामगिरी निराशाजनक होती. त्यांच्या जागी नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. पण अर्शदीप सिंगला काही कसोटी पदार्पणाची संधी मिळाली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.