Pakistani Celebrities Banned in india: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बरेच बिघडले. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांकडून बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, बहुतेक पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. बुधवारी या अकाउंट्सवरील बंदी उठवण्यात आली होती, परंतु त्यानंतर अवघ्या एका दिवसातच या अकाउंट्सवर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. या यादीत शाहिद आफ्रिदी आणि हानिया आमिरसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
खरं तर, बुधवारी काही तासांसाठी पाकिस्तानी स्टार्सची अकाउंट्स भारतात दिसू लागली. सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवण्यात आली असल्याचा अंदाज वर्तवला जात होता, परंतु गुरुवारी पुन्हा पाकिस्तानी स्टार्सची अकाउंट्स भारतात दिसणे बंद झाले. शाहिद आफ्रिदी, फवाद खान किंवा माहिरा खान यांच्या अकाउंट्स शोधल्यावर असे लिहिले आहे की 'हे अकाउंट भारतात उपलब्ध नाही.' तथापि, या प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Shefali Jariwala Ex Husband: 'आम्ही खाजगी विमानात होतो आणि...'; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर एक्स पतीचा धक्कादायक खुलासाअनेक पाकिस्तानी स्टार्सच्या अकाउंट्सवर बंदी
हानिया आमिरने अलीकडेच भारतीय अभिनेता दिलजीत जोसांझसोबत 'सरदार जी ३' या चित्रपटात काम केले आहे. यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. हानियाच्याही अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. तिच्यासोबत, माहिर खान, फवाद खान, शाहिद आफ्रिदी, मावरा होकेन, सबा कमर आणि अली जफर यांच्यासह अनेक स्टार्सचे अकाउंट भारतात दिसत नाहीत.
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाने तिच्या मृत्यूआधी घेतलं होतं हे इंजेक्शन; मैत्रिणीने केला मोठा खुलासा, म्हणाली 'मी तिथेच उभी...'भारत आणि पाकिस्तानमधील तणाव
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेकांना पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. तणावाच्या परिस्थितीत भारताने पाकिस्तानच्या स्टार्सच्या अकाउंट्सवर बंदी घातली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला, परंतु भारतीय सैन्याने प्रत्येक हल्ला हाणून पाडला.