Maharashtra Live Updates : बैलाऐवजी स्वतःलाचं औताला जुंपले, आता जिल्हाधिकाऱ्यांनाच थेट नोटीस
Sarkarnama July 09, 2025 02:45 PM
latur farmers news : बैलाऐवजी स्वतःलाचं औताला जुंपले, आता जिल्हाधिकाऱ्यांनाच थेट नोटीस

लातूरमध्ये शेतीच्या मशागतीचा खर्च परवडेना म्हणून एका 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने स्वतःलाचं औताला जुंपले होते. यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली असून थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या न्यायपीठाकडून जारी करण्यात आली आहे.

Mumbai railway flyover named sindoor News : आता मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव 'सिंदूर'; 10 जुलैला लोकार्पण

पेहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव मगवावा लागला होता. त्याचा बदला भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानमध्ये घुसून घेतला. त्यासाठी ऑपरेश सिंदूर राबण्यात आले होते. आता मुंबईतील मशीद बंदर येथे रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या कर्नाक पुलाचे नाव बदलण्यात येणार आहे. या पुलाला सिंदूर हे नाव देण्यात येणार आहे.

Sharad Pawar News : शिक्षकांच्या मुंबईतील आंदोलनाला आता शरद पवार स्वतः जाणार

मुंबईतील आझाद मैदानात विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. शिक्षकांनी शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता तोडगा न निघाल्यास शरद पवार हे बुधवारी आंदोलकांची भेट घेणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.