एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. एक 63 वर्षांचा शेतकरी आपल्या शेतीमध्ये काम करत होता, सकाळची वेळ होती. हा शेतकरी पहाटे शेतात काम करण्यासाठी जातो, असं घरी सांगून बाहेर पडला होता. मात्र रात्र होण्याची वेळ आली तर हा शेतकरी घरी काही परतला नव्हता, त्यामुळे या शेतकऱ्याचं कुटुंब काळजीत होतं, त्यांनी ही घटना गावातील इतर काही ग्रामस्थांना सांगितली, आणि हे कुटुंब ग्रामस्थांच्या मदतीनं या शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले.
गावातील लोकांनी जेव्हा या शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत मिळून या शेतकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना या शेतकऱ्याची मोटर सायकल त्याच्याच शेताजवळ उभी असलेली दिसली. या मोटरसायकल जवळ एक झोपडी देखील होती. जेव्हा लोकांनी या झोपडीमध्ये आत डोकावून पाहिलं तर त्यांना प्रचंड धक्का बसला कारण झोपडीमध्ये शेतकरी नव्हता तर एक भलं मोठं आजगर होतं, आणि या आजगराचं पोट प्रचंड फुगलेलं होतं. आजगराचं पोट पाहून या शेतकऱ्याला आजगरानं गिळलं असावं असा संशय ग्रामस्थांना आला, त्यामुळे त्यांनी या आजगराचं पोट फाडण्याचा निर्णय घेतला.
एका वेबपोर्टने दिलेल्या रिपोर्टनुसार ग्रामस्थांनी त्यानंतर आजगराचं पोट कापलं, तर त्यांना प्रचंड धक्का बसला, संपूर्ण गाव हादरलं कारण त्यांना आजगराच्या पोटामध्ये गायब झालेला शेतकरी आढळून आला, ग्रामस्थ येईपर्यंत खूप उशीर झाला होता, तोपर्यंत या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी या शेतकऱ्याचा मृतदेह त्याच्या घरी पोहोचवला.
ही घटना इंडोनेशियाच्या मजापहित या छोट्याशा गावामध्ये घडली आहे. दरम्यान यापूर्वी देखील अशीच एक घटना या गावाच्या परिसरामध्ये घडली होती, एका तरुणाला आजगरानं गिळलं होतं. अकबर असं या 25 वर्षांच्या तरुणाचं नाव होतं. त्याला एका 23 फूट लांब आजगरानं गिळलं होतं. त्या आजगराला मारल्यानंतर त्याच्या पोटात या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार इंडोनेशियाच्या या परिसरामध्ये सापांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे सध्या तेथील स्थानिक प्रशासन चिंतेत आहे, सापांची संख्या कमी करण्यासाठी उपाय -योजना सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत येथील लोकांवर आजगरानं हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, अनेक लोक या घटनांमध्ये गायब झाले आहेत, काही लोकांचा शोध लागला आहेत, तर अजूनही काही लोक बेपत्ता आहेत.