मसूदची मस्ती अजूनही उतरली नाही, मशिदीतून भारताला सर्वात मोठी धमकी, तुमच्या मिसाइलही रोखणार नाहीत, आमच्याकडे 10,000
GH News July 09, 2025 04:06 PM

Masood Azhar Audio: पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या भारतीय नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या केली. त्यानंतर संतापलेल्या भारताने ‘ऑपरेश सिंदूर’ राबवत पाकिस्तान चोख उत्तर दिलं. यामध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. दरम्यान जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि म्होरक्या मसूद अजहर याने भारताला मशीदीतून धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या मशीदीतून मसूद अजहर याचा एक ऑडियो समोर आला आहे.

रिपोर्टनुसार, बहावलपूर मशिदीत वाजवल्या जाणाऱ्या ऑडिओमध्ये मसूद अझहर भारताला धमकी देताना ऐकू आला. मसूद म्हणाला, ‘दुसऱ्यांकडे सर्वकाही असलं तरी आमच्याकडे आत्मघाती हल्ले करणारे अनेक जण आहे.’ सांगायचं झालं तर, बहावलपूर मशीद त्याच जागी आहे, जिथे ऑपरेश सिंदूर दरम्यान भारताने हवाई हल्ले केले होते.

बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे एक प्रमुख प्रशिक्षण आणि विचारसरणी केंद्र होतं, ज्याला या कारवाईत लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यांमध्ये मसूद अझहरचे डझनभर नातेवाईक मारले गेले.

रिपोर्टनुसार, ऑडियोमध्ये मसूद अजहर म्हणाला, ‘दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या निधीचा उपयोग जिहादसाठी करण्यात येईल. पाकिस्तानला पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या आशिर्वादाची तितकीच गरज आहे, जितकी मोठ्या धार्मिक नेत्यांना आहे. आमच्याकडे आत्मघाती हल्ले करणारे अनेक जण आहे. कोणतंही मिसाइल त्यांचे काहीही वाईट करु शकणार नाही. आमच्याकडे 30,000 लोकांचा केडर आहे. जैशकडे जिहादसाठी 10,000 आत्मघाती हल्ले करणारे दहशतवादी आहेत.’

मसूद अझहर याला पुन्हा जिवंत करतोय पाकिस्तान

भारताच्या भीतीमुळे मसूद अझहर गेल्या अनेक दशकांपासून लपून बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा कोणताही आवाज किंवा सार्वजनिक उपस्थिती समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत, प्रश्न असा निर्माण होतो की भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर असं काय घडलं की पाकिस्तान मसूद अझहरला पुन्हा समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे?

तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, मसूद याचा ऑडिओ समोर आणणं पाकिस्तानकडून रचण्यात आलेलं मोठं कटकारस्तान आहे. भारतात अमरनाथ यात्रा जोरात सुरू असल्याने ऑडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान मसूद अझहरचा ऑडिओच्या माध्यमातून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे.

मसूद अजहर कोण आहे?

मसूद अजहर हा संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेला दहशतवादी आहे. तो पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि म्होरक्या देखील आहे. या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. अजहर याचा जन्म 1968 मध्ये झाला होता. आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला कराचीतील एका मदरशात पाठवण्यात आलं. हा मदरसा पाकिस्तानी जिहादी गटांशी जोडला गेला होता, ज्यातून अझहर 1989 मध्ये पदवीधर झाला. तो सोव्हिएत-अफगाण युद्धात सामील झाला आणि हरकत-उल-मुजाहिदीनच्या वतीनं लढण्यासाठी भरती झाला, परंतु कमकुवत शरीरयष्टीमुळे तो प्रशिक्षण पूर्ण करू शकला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.