India – Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेश सिंदूर’ राबवत पाकिस्तावर हल्ला केला. ज्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. ‘ऑपरेश सिंदूर’ दरम्यान भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची अशा प्रकारे फजेती केली ज्यामुळे पाकिस्तानला वाटलं की त्यांनी भारताचा एक राफेल फायटर जेट उद्ध्वस्त केला आहे. पण यामागचं सत्य पूर्णपणे वेगळं आहे. खरं तर, भारताने राफेलच्या अत्याधुनिक X-Guard डिकॉय सिस्टमचा वापर करून पाकिस्तानच्या रडार आणि क्षेपणास्त्र यंत्रणेची दिशाभूल केली.
X-Guard एक फायबर ऑप्टिक टो डिकॉय आहे, जो राफेलच्या इलेट्रॉनिक वॉरफेयर सिस्टमचा एक भाग आहे. त्याचे काम शत्रूच्या रडार-मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी शस्त्रे चुकीच्या दिशेने निर्देशित करणं आहे. डिकॉय शत्रूला रडारबद्दल चुकीच्या लोकेशनची माहिती देतो आणि डेव्हलपर्स सिग्नलला हुबेहू कॉपी करतं. सिग्नल फक्त दोन सेकेंदात अॅक्टिव्ह होतो आणि 360 डिग्रीमध्ये 500 व्हॅटचा जॅमिंग सिग्नल पाठवतो. त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे, शत्रूला असं वाटतं की त्यानं खऱ्या राफेलला लक्ष्य केलं आहे, तर प्रत्यक्षात ते एक डिकॉय असतं.
अमेरिकेचे माजी लढाऊ वैमानिक रायन बोडेनहाइमर यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, राफेल मशिन आतापर्यंत राबवण्यात आलेली सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर डिकॉयिंग आहे. भारताने X-Guard च्या मदतीने पाकिस्तानच्या J-10C फायटर जेट आणि PL-15E मिसाईलची दिशाभूल केली. पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या KLJ-7A AESA रडारना हे ओळखता आलं नाही की त्यांनी खऱ्या विमानाला नव्हे तर बनावट विमानाला धडक दिली. यामुळे पाकिस्तानने दावा केला की त्यांनी भारतीय राफेल पाडले आहे, जेव्हा की प्रत्यक्षात ते एक्स-गार्ड होते.
डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष एरिक ट्रॅपियक यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.त्यांनी भारताने एक राफेल गमावल्याचा स्वीकर केला. पण त्याचं कारण तांत्रिक बिघाड होत. शत्रूला यामध्ये काहीही करता आलेलं नाही. 12 हजार मीटर उंचीवर एका दीर्घ प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हे विमान कोसळलं. भारताचे संरक्षण सचिव आर.के. सिंग यांनी स्पष्टपणे सांगितले की, राफेल पाडल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा आहे आणि इलेक्ट्रॉनिक युद्धातील भारताच्या तंत्रज्ञानाने शत्रूला पूर्णपणे मूर्ख बनवलं आहे.
फ्रांसीसी मीडिया रिपोर्टनुसार, चीनने राफेलची प्रतिमा डागाळण्यासाठी आपल्या राजनैतिक नेटवर्कचा वापर केला. राफेल तत्वज्ञानात कमकुवत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला, तर ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केलं की राफेल आणि भारताची रणनीती आज सर्वात प्रगत आहे.