भारतीय बाजारात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार देखील इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे सरकारच्या वाढत्या पाठींब्यामुळे वाहन निर्मात्या कंपन्या देखील इलेक्ट्रीक वाहने वाढविण्यावर काम करीत आहेत. एकीकडे कंपन्यांना इलेक्ट्रीक वाहनांवर मोठा डिस्काऊंट देत असताना आणि बॅटरीवर देखील लाईफ टाईम वॉरंटी मिळत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारसह राज्य सरकार देखील ईलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देत आहेत.
या मोहिमेत आपले शेजारील राज्य कर्नाटक देखील सामील झाले आहे. कर्नाटक सरकारने रोड टॅक्स पॉलीसीत बदल केले आहे. जर तुम्ही नवी टाटा हॅरियर ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता या कारला खरेदी करणे सोपे झाले आहे.
कर्नाटकने रोड टॅक्स पॉलीसीत केलेल्या बदलामुळे २५ लाख रुपयांहून जादा एक्स शोरुम किंमत असलेल्या इलेक्ट्रीक कारवर एक्स शोरुम किंमतीच्या १० टक्क्यांपर्यंत रोड टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे तुमच्या साठी हॅरिएरची इलेक्ट्रीकची लाँग रेंजची कार खरेदी करणे सोपे जाणार आहे.
भारतीय बाजारात टाटा हॅरिएर ईव्हीची एक्स शोरुम किंमत २४.९९ लाख रुपये आहे. ज्यामुळे १० टक्के रोड टॅक्स फ्रि होतो. त्यामुळे तुम्हाला या कारवर आरामात २.५० लाखाची बचत होऊ शकते. टाटा मोटर्सने आपल्या सध्याच्या इलेक्ट्रीक वाहन ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जर नवीन Tata Harrier EV खरेदी केली तर त्यांना १ लाख रुपयांपर्यंत एक्सक्लुसिव्ह लॉयल्टी बेनिफिट मिळणार आहे. ही इलेक्ट्रीक SUV तीन ट्रिम्स Adventure, Adventure S आणि Fearless+— मध्ये येते. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा फुल चार्ज केली तर ६२२ किमीपर्यंत रेंज देते.
Harrier EV त्या बेस व्हेरिएंटची किंमत २१.४९ लाख रुपए ( एक्स-शोरूम ) आहे आणि या कारला २१,००० रुपयांचा टोकन अमाऊंटसह बुक करता येते. ही टाटाची सर्वात नवीन इलेक्ट्रीक कार आहे. ज्यात आधुनिक फिचर्स आणि मोठी रेंजचे दमदार कॉम्बिनेशन मिळते, ही ऑटोमॅटीक पार्किंग फिचरने देखील सुसज्ज आहे.
टाटा हॅरियर EV आता एक ५४०-डिग्री कॅमरा सिस्टीम मिळत आहे.जो ३६० डिग्री सराऊंड व्यूह मॉनिटरमध्ये एक एंगल जोडतो. हा नवा एंगल ट्रान्सपरेंट मोडमध्ये एक्टीव्ह होतो. कारच्या खालची स्थितीही त्यामुळे स्पष्ट दिसते. यामुळे ड्रायव्हरला ऑफ रोडींग वा खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरही चांगली व्हिजिबिलिटी मिळते.
हॅरियर EV ही तिच्या सेगमेंटची पहिली ड्युअर मोटर ऑल व्हील ड्राईव्ह इलेक्ट्रीक सुव्ह कार बनली आहे.यात पुढे आणि पाठी दोन्ही एक्सलवर एक-एक इलेक्ट्रीक मोटर दिलेली आहे. जी तिला चांगली ग्रिप आणि कंट्रोल देते. या शिवाय बूस्ट मोडच्या मदतीने ही सुव्ह केवळ ६.३ सेंकदात ० ते १०० किमी/प्रति तास वेग पकडू शकते.