<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">नेटिव्ह शेअर अॅँड स्टॅाक ब्रोकर्स असोसिएशन म्हणून स्थापन झालेल्या बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज भारतातील पहिले, तर आशिया खंडातील सर्वात जुने स्टॅाक एक्सचेंज म्हणून ओळखले जाते. याचा क्रमांक जगातील 10 वा सर्वात जुने स्टॅाक एक्सचेंज म्हणूनही लागतो. आज बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज 150 वे वर्ष साजरे करत आहे. याची स्थापना 9 जुलै 1875 रोजी उद्योगपती प्रेमचंद रॅायचंद यांच्याद्वारे करण्यात आली, जे त्या काळी कॅाटन किंग म्हणून ओळखले जात होते.
भारताच्या भांडवली बाजाराच्या विकासात बीएसईचे सर्वोच्च योगदान आहे. हे अधिकृतपणे स्थापना होण्याआधी, 20 वर्षांपासून बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज मुंबई येथील टाऊन हॅाल समोर चालत असे. नंतर बीएसईचे मुख्यालय फिरोज जीजीभॉय टॉवर्सचे बांधकाम 1973 मध्ये सुरु झाले. जे दलाल सेंट, फोर्ट येथे स्थित आहे.
केवळ 318 सदस्यांपासून सुरुवात झालेल्या या स्टॅाक एक्सचेंजसाठीचा प्रवेश शुल्क सुरुवातीला फक्त एक रुपया होता. मुंबई, गुजरात आणि मद्रास सारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांच्या जवळ असल्याने, एक्सचेंजचा विस्तार झपाट्याने झाला. आज बॅाम्बे स्टॅाक एक्सेंजमधील कंपनीची संख्या 5671 असून एकूण बाजार भांडवल 461 लाख कोटी आहे.
निर्देशांकाद्वारे एक्सचेंजचे मोजमाप केले जाते, हे लक्षात घेता 1986 मध्ये बीएसई सेन्सिटिव्ह इंडेक्सची सुरूवात केली गेली. जो "मार्केट कॅपिटलायझेशन-वेटेड" इंडेक्स या नावाने जानेवारी 1986 मध्ये समोर आला. हा भारतातील पहिला इक्विटी इंडेक्स होता. त्यानंतर 1994 मध्ये नॅशनला स्टॅाक एक्सचेंज कार्यरत झाले. ज्यामुळे, डिजिटल ट्रेडिंग सुरु झाले आणि गुंतवणूकदारांना स्टॅाकच्या किंमती चालू वेळी उपलब्ध होऊ लागल्या.
बीएसईमध्ये आर्थिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीमद्वारे ऑनलाइन केले जातात. बॅाम्बे स्टॅाक एक्सेंजइक्विटी, चलने, कर्ज साधने, डेरिव्हेटिव्हज तसेच म्युच्युअल फंड अशा गोष्टींच्या व्यापारासाठी बाजारपेठ खुली करते.बीएसईचा सेन्सेक्स भारतातील ३० सर्वात मोठ्या आणि सर्वात चांगल्या भांडवलाच्या स्टॉकचे प्रतिनिधित्व करतो जो देशातील सर्वाधिक पाहिलेला निर्देशांक आहे.
1907 मध्ये स्वदेशी चळवळ आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा आयपीओ हे बीएसईसाठी महत्त्वाचे टप्पे ठरले. 1995 मध्ये, बीएसईने स्क्रीन-आधारित ट्रेडिंग सिस्टम सुरू केली आणि तिला बॉम्बे ऑनलाइन ट्रेडिंग सिस्टम म्हणजेच बोल्ट असे नाव देण्यात आले. नंतर बीएसईने सप्टेंबर 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत स्टॅाक एक्सचेंज उपक्रमात भागीदार एक्सेंज म्हणून पाऊल ठेवले.
बॅाम्बे स्टॅाक एक्सेंज हा देशाचा प्रमुख स्टॅाक एक्सचेंज म्हणून, बीएसई भारताच्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ राहील, जो भरभराटीसाठीही एक प्लॅटफॅार्म म्हणून काम करेल.
& nbsp;