Shubman And Sara : शुबमन गिल-सारा तेंडुलकर इंग्लंडमध्ये एकत्र;फोटो व्हायरल!
GH News July 09, 2025 09:07 PM

भारतीय क्रिकेट संघ सध्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा सामना 10 जुलैपासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी लंडनमध्ये मंगळवारी 8 जुलैला टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याने एका कार्यक्रमांच आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकत्र आले. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युवराज सिंहच्या युवीकॅन फाउंडेशनकडून चॅरिट डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक आजी माजी खेळाडू उपस्थितीत होते. कॅन्सरसारख्या घातक आजाराबाबत जागरूकतेसाठी आणि निधी उभारण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील खेळाडू कर्णधार शुबमन गिल याच्यासह उपस्थित होते. या दरम्यान एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शुबमन-सारा एकत्र!

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हे दोघे असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल फोटोत शुबमन कुठेतरी पाहता दिसतोय. तसेच या व्हायरल फोटोत पाठ केलेली तरुणी दिसत आहेत. ती तरुणी सारा असल्याचा दावा केला जात आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर शुबमन आणि सारा या दोघांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळत आहे.

व्हायरल फोटोत शुबमन हसताना दिसत आहे. तर शुबमनसमोर सारा असल्याचा दावा केला जात आहे. साराकडून या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. साराने या कार्यक्रमात तिच्या मित्रांसह उपस्थिती लावली होती.

सोशल मीडियावर शुबमन-सारा या दोघांची अनेकदा नावं जोडण्यात आली आहेत. या दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याचा दावा सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांकडून करण्यात येतो. त्यानंतर आता या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा सारा-शुबमन प्रकरणाला हवा मिळाली आहे. सारा आणि शुबमन हे याआधी एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करायचे. मात्र या दोघांमध्ये तसं काही नाही जे सोशल मीडियावर पाहायला मिळतं.

शुबमन गिल काय म्हणालेला?

दरम्यान शुबमनने सोशल मीडियावर रिलेशनबाबत होणाऱ्या अनेक दाव्यांबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. “माझं नाव वेगवेगळ्या लोकांसोबत जोडलं जातं.या सर्व अफवा आहेत. माझं लक्ष हे करियरवर आहे”, असं शुबमनने तेव्हा स्पष्ट केलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.