शहापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहर हादरलं आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं शाळेतल्या मुलींची तपासणी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. शहापूरमधल्या आर. एस. दामानिया शाळेवर पालकांनी हा गंभीर आरोप केला आहे. स्वच्छता गृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं सहावी ते दहावीच्या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे, संतप्त पालकांकडून आंदोलन देखील करण्यात आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं शाळेतल्या विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. स्वच्छता गृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं सहावी ते दहावीच्या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी केल्याचा आरोप पालकांनी शहापूरमधील आर. एस. दामानिया शाळेवर केला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलींचे कपडे काढून शाळेतल्या शिक्षिकेंनी तपासणी केली, मुख्यध्यापिकेच्या आदेशानुसारच हा प्रकार घडल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात आला आहे. सर्व मुलींच्या फिंगर प्रिंटही शाळा प्रशासनानं घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
पालकांचं आंदोलन
पालकांकडून या शाळेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुख्यध्यापिकेच्या आदेशानुसारच हा प्रकार घडल्याचा पालकांचा आरोप आहे. मुख्यध्यापिकेवर कारवाई करा, शाळेवर कारवाई करा, शाळेला ताळं ठोका अशी मागणी संतप्त पालकांनी केला आहे. पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं आहे. पालकांनी केलेल्या आरोपांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मुलींमध्ये भीतीचं वातावरण
दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, स्वच्छता गृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्यानं सहावी ते दहावीच्या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेत तपासणी करण्यात आली, हा सर्व प्रकार मुख्यध्यापिकेच्या आदेशानुसार झाला असा आरोप पालकांनी केला आहे. घडलेल्या या प्रकारामुळे पालक चांगलेच संतप्त झाले असून, त्यांनी शाळेविरोधात आंदोलन केलं आहे, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.