उंच तटबंदी, कुंपणात वीजप्रवाह,धर्मांतरणासाठी मुलींना या खास खोलीत ठेवायचा छांगुरबाबा
Tv9 Marathi July 10, 2025 01:45 AM

उत्तर प्रदेशातील बलरामपुर जिल्ह्यात छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीन याच्यावर बळीजबराने धर्मांतरण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली होती. या छांगुर बाबा अटक केल्यानंतर त्याच्या आलीशान घराची देखील चर्चा होत आहे. या सफेद रंगाच्या कोठीत दहा खोल्या होत्या. त्यातून अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. त्यात हिंदू लोक मनगटाला बांधतात तसे धागे गंडेदोरे सापडले आहेत. या सफेत कोठीवर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. या कोटीत २ बीएचके सारखे सुसज्ज फ्लॅट बांधलेले होते. यात आलिशान बेड, मोठे हॉल आणि सर्व सोयी सुविधा होत्या. प्रत्येक रुममध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था होती. त्यामुळे येथे लांबचा मुक्काम करण्याची सर्व सोयी सुविधा होत्या असे यावेळी उघड झाले आहे.
विष्ठा

एका खाजगी चॅनलची टीम या छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीन याच्या कोठीत पोहचली तेव्हा या खोल्यात ‘कलावा’ ( मनगटाला बांधला जाणारा केशरी वा रंगीबेरंगी धागा ) उर्दूत लिहिलेली धार्मिक पुस्तके सापडली आहेत. त्यामुळे असा संशय वाढला आहे की छांगुर बाबा धर्मांतरण करण्यासाठी पीडीतांना हिंदूंची प्रतिकांचा वापर करुन भ्रमित करायचा, म्हणजे मुलगी आणि तिचे कुटुंबियांची दीशाभूल होईल.आता धर्मांतरण प्रकरणाचा तपास ईडी करणार आहे. ईडीने पोलिसांकडून एफआयआरची कॉपी घेतली आहे.

कुंपणात वीजेचा प्रवाह

सुरक्षेच्या नावाखाली कोठीला बाबाने चारी बाजूंनी १५ ते २० फूटांची उंच भिंत बांधून तिला लावलेल्या काटेरी तारांच्या कुंपणाला वीजप्रवाह सोडला जायचा. त्यामुळे कोणीही आत येऊ नये याची काळजी घेतली जात होती. त्यामुळे आजबाजूचे लोक या भिंतीच्या जवळपासही भटकत नव्हते.

जमालुद्दीन याची ही कोठी आता प्रशासनाच्या निगराणी खाली असून येथील सर्व वस्तूंचा तपास केला जात आहे. या आलिशान कोठीचा वापर धर्मांतरणासाठी केला जात होता. जेथे मुलींना फूस लावून बराच काळ ठेवले जात होते.

बुलडोझर फिरवला

छांगुर जमालुद्दीन बाबाच्या आलीशान कोठीवर प्रशासनाने बुलडोझर कारवाई सुरु केली आहे. ही कोठी अवैधपणे तयार केली होती असा आरोप होत आहे. या कोठीत आपल्या सहकाऱ्यांसह राहून हा बाबा धर्मांतरणाचे रॅकेट चालवत होता. या कोठीला त्याच्या काळ्या कृत्यांचा अड्डा म्हटले जात आहे. येथे अनेक बेकायदेशीर कृत्ये केली जात होती. प्रशासनाने मोठा बंदोबस्तात या कोठीच्या अनधिकृत बांधकामांना पाडण्याची कारवाई केली आहे. छांगुर बाबा त्याचे सहकारी नवीन रोहरा आणि नीतू रोहरा यांच्यासह रहात होता.

आलीशान कोठीत ४० खोल्या, दुबईतील सामान

४० खोल्यांच्या या कोठीवर छांगुरबाबाने तीन कोटी रुपये खर्च केले आहे.छांगुरबाबा केवळ इम्पोर्टे वस्तूंचा वापर करायचा. खास दुबईतून सामान मागवायचा. त्याचे एक पाऊल कोठीत तर दुसरे पाऊल परदेशात असायचे. काही दिवस येथे रहायचा आणि बाकी दिवस परदेशात घालवायचा.बुलडोझर कारवाईत या कोठीत एक गुप्त खोली होती असा छडा लागला आहे. याच खोलीत धर्मांतरण केलेल्या मुलींना ठेवले जात होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.