संयुक्त अरब अमिराती सरकारने आपला गोल्डन व्हिसा कार्यक्रम केवळ भारत किंवा निवडक देशांसाठी असल्याचे नाकारले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या नागरिकत्व, सीमा शुल्क आणि पोर्ट सिक्युरिटी अथॉरिटीने या वृत्ताचे खंडन केले आहे, ज्यात म्हटले आहे की युएईने काही राष्ट्रीयतेसाठी आजीवन गोल्डन व्हिसा आणला आहे.
आयसीपीने स्पष्ट केले की युएई गोल्डन व्हिसा अर्ज केवळ अधिकृत सरकारी चॅनेलद्वारे व्यवस्थापित केले जातात. गोल्डन व्हिसाच्या श्रेणी, अटी आणि नियंत्रणे संयुक्त अरब अमिराती कायदा आणि मंत्रिस्तरीय निर्णयानुसार निश्चित केली जातात. आयसीपीने सांगितले की, त्यांना काही देशी-विदेशी माध्यमे आणि वेबसाइट्सवर पसरत असलेल्या अफवांची माहिती मिळाली आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की युएई गोल्डन व्हिसा अर्जातील कोणतीही अंतर्गत किंवा बाह्य सल्लागार संस्था अर्ज प्रक्रियेत मंजूर पक्ष मानली जात नाही. आयसीपीने आपल्या निवेदनात कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही, परंतु अहवालात असे सूचित केले गेले आहे की व्हिसा फक्त भारतीयांनाच दिला जाऊ शकतो. यावर यूएईकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू
आयसीपीने म्हटले आहे की, ते आजीवन युएई गोल्डन व्हिसाबद्दल अफवा पसरवणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करतील. यूएई गोल्डन व्हिसाबद्दल जाणून घेण्यासाठी, लोकांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. आयसीपी म्हणाले की, ते सर्वांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण प्रदान करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. डिजिटल करन्सी गुंतवणूकदारांना गोल्डन व्हिसा मिळण्याची संधी मिळणार नाही, असेही युएईने स्पष्ट केले आहे.
संयुक्त अरब अमिरातीने नुकतीच नॉमिनेशन बेस गोल्डन व्हिसा योजना जाहीर केली आहे. गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी एकरकमी एक लाख दिरहम म्हणजेच 23.3 लाख भारतीय रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच 23 लाख रुपये भरून तुम्हाला आयुष्यभर दुबईत राहण्याची संधी मिळू शकते. या व्हिसा चाचणीच्या पहिल्या टप्प्यासाठी भारत आणि बांगलादेशची निवड करण्यात आली आहे.
गोल्डन व्हिसा कसा मिळवावा
संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकार्यांनी सांगितले आहे की, गोल्डन व्हिसा देण्यापूर्वी अर्जदाराची पार्श्वभूमी तपासली जाईल. यामध्ये मनी लाँड्रिंग विरोधी आणि गुन्हेगारी रेकॉर्ड, तसेच सोशल मीडियाच्या तपासाचा समावेश असेल. संयुक्त अरब अमिराती सरकारच्या अधिकाऱ्यांकडे अंतिम नामांकन प्राधिकरण आहे. नामांकन श्रेणीअंतर्गत, युएई गोल्डन व्हिसासाठी इच्छुक अर्जदार दुबईला न जाता त्यांच्या मायदेशातून मंजुरी मिळवू शकतात.
गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्यांना दुबईत आणण्याची परवानगी दिली जाणार आहे. या व्हिसाच्या आधारे नोकर आणि ड्रायव्हर असण्यासही परवानगी देण्यात येणार आहे. संयुक्त अरब अमिराती सरकारला आशा आहे की या योजनेअंतर्गत पहिल्या तीन महिन्यांत 5,000 पेक्षा जास्त भारतीय अर्जदारांना गोल्डन व्हिसा मिळू शकेल.