ENG vs IND : नितीशकडून पहिल्याच ओव्हरमध्ये ओपनर जोडीचा गेम, इंग्लंडला 2 झटके, पाहा व्हीडिओ
GH News July 10, 2025 08:06 PM

वेगवान गोलंदाज नितीश कुमार रेड्डी याने टीम इंडियाला इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अप्रतिम सुरुवात करुन दिली आहे. उभयसंघात अँडरसन-तेंडुलकर टेस्ट सीरिजमधील हा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. नितीशने या मैदानात एकाच ओव्हरमध्ये इंग्लंडला 2 झटके देत यजमांनाना बॅकफुटवर ढकलंल आहे. नितीशने इंग्लंडच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे नितीशच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील लॉर्ड्सवरील ही पहिली ओव्हर होती. नितीशने अशाप्रकारे या पहिल्याच ओव्हरमध्ये अविस्मरणीय कामगिरी करुन दाखवली.

इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून बेन डकेट आणि झॅक क्रॉली ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी संयमी सुरुवात केली. या जोडीने 1-1 धाव करुन 40 पार मजल मारली. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत होती. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या 3 वेगवान गोलंदाजांनी ही जोडी फोडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र यात तिघांनाही यश आलं नाही. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल याने नितीशला बॉलिंग देण्याचा निर्णय घेतला.

नितीशनेही कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. नितीश इंग्लंडच्या डावातील 14 वी तर त्याच्या कोट्यातील पहिली ओव्हर टाकायला आला. नितीशने तिसऱ्याच बॉलवर बेन डकेट याला आऊट करत ही जोडी फोडली. नितीशने इंग्लंडला 43 धावावंर पहिला झटका दिला. नितीशने डकेटला विकेटकीपर ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. डकेटने 23 धावा केल्या.

त्यानंतर नितीशने दुसऱ्याच बॉलवर मैदानात आलेल्या ओली पोप याला पद्धतशीर फसवलं होतं. मात्र कॅप्टन शुबमन गिल कॅच पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे ओलीला जीवनदान मिळालं. त्यानंतर पोपने 14 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिंगल घेत झॅक क्रॉली याला स्ट्राईक दिली. नितीशने या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर डकेटनेंतर झॅक क्रॉलीचा गेम वाजवला.

नितीशकडून इंग्लंडच्या ओपनर जोडीचा गेम

नितीशने झॅकलाही विकेटकीपर पंतच्या हाती कॅच आऊट केलं. झॅक 18 रन्स करुन आऊट झाला. नितीशने एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिल्याने इंग्लंडची स्थिती 43-0 वरुन 44-2 अशी झाली. त्यामुळे आता नितीशसह इतर 3 गोलंदाजांकडून अशीच बॉलिंग भारतीय समर्थकांना अपेक्षित असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.