खुर्चीवर बोल्ड सीन देताना रेखा अन् अभिनेत्याचा ताबा सुटला, सीनदरम्यान चक्क खुर्ची तुटली
Tv9 Marathi July 10, 2025 10:45 PM

सदाबहार सौंदर्य म्हटलं की नाव येतं ते रेखा यांचं. रेखा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. उत्कृष्ट अभिनय कौशल्य असोत किंवा नृत्य. रेखा यांचे सौंदर्य आजही तेवढेच नावाजले जाते. रेखा यांचे मोहक सौंदर्य आणि सुंदर हास्य कोणत्याही अभिनेत्रीशी स्पर्धा करू शकत नाही. रेखा या त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत राहिल्या आहेत.

रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य अजिबात सोपे नव्हते.

रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य अजिबात सोपे नव्हते. त्यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. रेखा यांनी काही चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यातील एक चित्रपट तर खूप चर्चेत आला होता. त्यांनी ओम पुरी यांच्यासोबत एक चित्रपट केलेला त्या चित्रपटात त्या दोघांचा एक बोल्ड सीन होता. तो बोल्ड सीन करताना ते दोघे इतके वाहत गेले कि त्यांचे नियंत्रण सुटले आणि या सीनमधील खुर्ची तुटली.

रेखा आणि ओम पुरी यांच्या या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने अनेकांना आश्चर्यचकित केले

रेखा आणि ओम पुरी यांच्या 1997 च्या या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने अनेकांना आश्चर्यचकित केले होते. या चित्रपटाचे नाव आहे ‘आस्था: इन द प्रिझन ऑफ स्प्रिंग’.या चित्रपटातील बोल्ड सीन्सने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडवून दिली होती. 3 तास ​​30 मिनिटांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बासू भट्टाचार्य यांनी केले आहे. या चित्रपटात रेखा, ओम पुरी, नवीन निश्चल आणि डेझी इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मानसी आणि अमरची कथा आहे, ज्यांना एक मुलगी आहे. अमर पूर्णवेळ नोकरी करतो. मानसी घरातील कामे आणि मुलीची काळजी घेते.एके दिवशी, जेव्हा मानसी तिच्या मुलीसाठी शूज खरेदी करायला जाते तेव्हा तिला कळते की शूज खूप महाग आहेत आणि ती ते न खरेदी करता दुकानातून बाहेर पडते. मात्र त्यावेळी एक अनोळखी मुलगी तिला मदत करते आणि शूजसाठी पैसे देते, ज्यामुळे तिला एका अनपेक्षित परिस्थितीत आणले जाते, ज्यामुळे तिचे आयुष्य बदलते.

चित्रपटात इंटीमेट सीन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

या चित्रपटात रेखाने मानसीची भूमिका केली होती तर ओम पुरी यांनी अमरची भूमिका केली होती. दोघांमधील केमिस्ट्रीने अनेकांना आश्चर्यचकित केले. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या अपेक्षांनुसार चालला नसला तरी रेखा आणि ओम पुरी यांच्यातील इंटीमेट सीन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

खुर्चीवर इंटिमेट सीन देताना खुर्ची तुटली

चित्रपटातील दोघांमध्ये अनेक हॉट सीन्स होते, ज्यामुळे प्रेक्षकांना आश्चर्य वाटले. चित्रपटात दोघांमध्ये एक बोल्ड सीन आहे, ज्यामध्ये ते खुर्चीवर इंटिमेट होताना दिसत आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, हा सीन रिअल दाखवण्यासाठी ओम पुरी आणि रेखा यांना आणखी पुढे जावे लागले. रेखा आणि ओम पुरी त्यांच्या प्रेमाच्या दृश्याचे चित्रीकरण करताना खूपच शारीरिकरित्या फारच जवळ आले. दोघेही इतके त्या सीनमध्ये इतके वाहत गेले कि त्यांच्या वजनामुळे खुर्ची तुटली.

एका वृत्तानुसार या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती मौसमी चॅटर्जी होती. त्यांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता, परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. बासू भट्टाचार्य दिग्दर्शित हा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही महिन्यांनी त्यांचे निधन झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.